जिल्हा कृषी अधिकारी यांनी केला कमलाकर ठाकरे यांचा सत्कार

जिल्हा कृषी अधिकारी यांनी केला कमलाकर ठाकरे यांचा सत्कार
शंकरपूर(जगदिश पेंदाम) 
       जिल्हा कृषी अधीक्षक  भाऊसाहेब बराटे यांनी जवराबोडी येथील कमलाकर ठाकरे यांनी कृषी मित्र म्हणून परिसरात चांगले कार्य केल्याबद्दल व वेळोवेळी शासनाची मदत केल्याबद्दल यांना ज्ञानेश्वरी ग्रंथ व शाल श्रीफळ देऊन कृषी अधिकारी ऑफिस चंद्रपूर येथे गौरव करण्यात आले आहे...
     मागील काही महीन्यात शंकरपुर येथील दत्त कृषी केंद्र संचालक राजू वैद्य यांनी बोगस खते, औषधी व बियाणे विकून मोठा भ्रष्टाचार केला व  चिमुर तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांना लाखो रुपयांनी फसविले या प्रकरणाचा कमलाकर ठाकरे यांनी कोणाचे दबावात न येता पर्दाफाश केला व शासनाची तसेच परिसरातील शेतकऱ्यांची मोठी मदत केली याची कृषी जिल्हा अधिक्षक चंद्रपूर यांनी दखल घेऊन कृषी अधीक्षक कार्यालय चंद्रपूर येथे श्री कमलाकर ठाकरे यांना ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भाऊसाहेब भराटे कृषी अधीक्षक चंद्रपूर कमलाकर ठाकरे जवराबोडी चंदू गजघाटे जवराबोडी तसेच पवन गजघाटे जवराबोडी हे उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!