इसऱ्याचं लेणे - माजी झाडीबोली
इसऱ्याचं लेणं, नटण्या-मुरडण्याचा ऐवज म्हणजे सागराला वापरण्यात आलेले दागिने म्हणजेच इसऱ्याचं लेणं लेवून मुरझ चानलेली नार गोमरी जशी शोभीवंत दिसते, इसर्र्मुळे तिचे सौंदर्य खुलून दिसते तशी माझी झाडीबोली इसऱ्याचे लेग लेवून शाभीवंत, अधिक सौंदर्यपूर्ण झालेली आहे. अशी ही सौंदर्यपूर्ण बोली भाषा विदर्भातील वैनगंगा नदीच्या पूर्वेकडील चार जिल्हे भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या महाराष्ट्राच्या अणिपूर्वेकडील भागात बोलणाऱ्या बोलीभाषेला 'झाडीबोली' म्हणून ओळखले जाते व स्थळाला झाडीपट्टी' असे संबोधले जाते.
झाडीपट्टी ही हिरवीगार' शेताच्या बोध्याला लागून असलेले जंगल, भरपूर प्रमाणात असलेली झाडे असल्यानेच काही भागाला झाडीपट्टी असे नाव पडले व हेल काढून, जरा शेवात बोलली जाणारी भाषा म्हणजे 'झाडीबोली', स्थानिक लोक जी भाषा बोलतात ती प्रमाण भाषेपेक्षा वेगळी आहे प्रमाण भाषेत व्याकरणाला फार महत्व आहे तसेच भाषत लिंगालाही फार महत्व आहे. जसे की प्रमाणभाषेत जर प्रमाण आताच गावाहून आले बोलायचे तर धुळेकडील स्त्री म्हणेन 'हंयमी लर झाडिबोलीत सरळ म्हणेन : आव मी आपला आलू, किंवा आली, असे बोलेल झाडीबोलीत, व्याकरण -दिर्घ, लिंग यानी काही फरक पडत नाही तर इथल्या लोकांच्या मनातील भाव दर्शविणारी भाषा आहे.
झाडीबोली टिकून राहावी व या भागातील लोकांना कोणापुढेही लाजवाटण्याची गरज नसावी यासाठी या भाषेचा प्रसार व प्रचारधन व संशोधन महर्षि, झाडीबोलीचे अग्रणी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी अतिशय परिश्रम घेवून झाडीबोली चळवळ सुरु केली व झाडीबोलीचा वापर करतोय प्रसार आणि प्रचार अनेक व्या लेखनातून सुरु झाला. नाटय, कविता, लेख, भालकथा, प्रवास इ. वर आता झाडीबोलीत लेखन सुरु झाले. आणि आता तर वॉट्स माध्यमातून झाडीबोलीत लेखन करण्याची स्पर्धा घेवून तसेच झाडीबोलीतील शब्द टिकवून ठेवण्यासाठी शब्दांचे भांडार जमा होण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.
झाडीबोलीचे महत्व लोकांना वाटावे, आपण जी भाषा बोलतो ती आत्मविश्वासाने बोलली जात असतानाच तिचा अभिमानहीबाळगता यावा यासाठी झाडीबोलीतले साहित्य संमेलने भरविण्यात येवून त्यात साहित्यकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी साहित्य लेखनातील विविध पुरस्कारांचे आयोजनही करण्यात येते. तसेच संमेलनात पुस्तक प्रकाशन करण्यात येवून झाडीबोलीला आणखी समृद्ध करण्यासाठी साहित्याकांच्या लेखनाला चालना देण्यासाठी पुरस्कृत केल्या आते, झाडीबोली साहित्य संमेलनाची सुरुवात लोककला महर्षि
डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी सुरुवात केली 26जानेवारी १९९१ मध्ये प्रथम झाडीबोली साहित्य संमोअन जवाहरनगर, जि. भंडारा येथे वि.सा. संघाचे जिल्हा साहित्य संमेलन झाले त्यात अध्यक्षीय भाषणात त्यांनी या उद्घोष करीत झाडीबोलीला सन्मान मिळवून देण्याचे ठाणले व १० ऑक्टोबर १९९७ ला झाडीबोली साहित्य संशोधन व मार्गदर्शन कैंपायी स्थापना करून संस्थापक अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतली बती आजतागायत पार पाडत आहेत. एक माग वटवृक्ष तयार आ
आज झाडीबोली सेवनाचा एक मांग तयार झालेला असून आता ह्या वटवृक्षाच्या फांदया व धुके चार जिल्ह्या पलीकडेही पसरत आहे याचे सर्व श्रेय संस्थापक अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर व बोलीभाव संवर्धन करणाऱ्या तमाम सर्व झाडीबोली रसिक झाडीरत्नांना जाते, त्यात चंद्रपूर जिल्हयाचेही योगदान आहे. ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, भी अदा चंद्रपूर जिल्हयाचे झाडीबोली साहित्याचे अध्यक्ष अरुण झगडकर, सर्व तालुक्यातील झाडीबोली तालुकाध्यक्ष, झाडीबोलीत लिहिणारे सर्व झाडीबोली साहित्यकाला जाते. त्याचीच अनुभती म्हणून आज २०२२ या वर्षात जूनासूरला येथे झाडीबोलीचे साहित्य संमेलन आहे व यात अनेक झाडीबोलीच्या साधकांचा सहभाग राहणार आहे. महिलांमध्ये ही झाडीबोलीच्या विकासाचे योगदान असावे. यासाठी महिला कार्यकारिणी देखील तयार करून मला झाडीबोली साहित्य महिला जिल्हा अध्यक्ष पद त्यासाठी झाडीबोली साहित्य कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष श्री. अरुण झगडकर यांना मी धन्यवाद देते व 13 मार्च २०२२ ला गुणान्या साहित्य सं झाडीबोली साहित्य संमेलनात सहभागी होणत्या सर्व मान्यवरांचे स्वागत करीत धन्यवाद देते.
प्रा. रत्नमाला प्रभाकर भोयर-कोरडे झाडीबोली साहित्य महिला जिल्हाध्यक्षा जि.चंद्रपूर



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!