दुर्मिळ पिवळा पळस फुलला....

दुर्मिळ पिवळा पळस फुलला....






शंकरपुर....जगदीश पेंदाम

माघ फाल्गुन महिना सुरु होताच सगळीकडे पळसाच्या झाडाला फुले लागायला सुरुवात होते जेव्हा पळसाचा झाडाला फुले लागतात तेव्हा होळी सणाची चालू लागली असे ग्रामीण भागात जनता समजतात व सर्वत्र केसरी, लाल फुले पळसाच्या झाडाला लागलेली दिसून येतात मात्र  दुर्मिळ असलेल्या पिवळ्या पळसाचा झाडाला फुले चिमुर तालुक्यामधील शंकरपुर भिसी रस्त्यालगत असलेल्या पुयारदड जवळ पिवळ्या रंगाचे पळसाला फुले लागलेली आहे..
ज्येष्ठ वयस्कर नागरिकांच्या म्हणण्यानुसार पिवळा पळस हा लाखात एक असू निसर्ग मधी तो क्वचितच पाहायला मिळत असते, पळसाला परिपत्रक, पलाश, रस, ब्रह्मपुष्प म्हणून ओळखले जाते पळसाची फुले स्वरस्वती व कालीमातेला पूजेसाठी वापरण्यात येते लाल केसरी पेक्षा पिवळ्या पळसाची फुले लहान असतात फुलापासून होळी सणाच्या प्राकृतिक रंग, फुलाच्या रसापासून औषधी तयार केली जाते तसेच आयुर्वेदात पंचांग उपयोगी वनस्पती म्हणून पळसाच्या झाडाची ओळख आहे..
पळसाच्या फुलातील मध वेचण्यासाठी असंख्य पक्षी झाडावर दिसतात पळसाचा पानापासून  जेवायला लागणाऱ्या पत्राळी, ड्रोन,बनवतात ग्रामीण भागात पळसाच्या फांद्या तोडून लग्न समारंभ मध्ये त्याचे विडी बनवून नवरदेव, नवरी, त्याची आई वडील व नातेवाईकांना त्यावर बसून आंघोळ करून दिली जाते, ईतर कार्य समारंभ केले जाते आजही ग्रामीण भागात पळसाच्या झाडाची साल काढून वधू मंडपात दरवाजा मध्ये बांधले जाते नवरदेव वधू मंडपी आल्यानंतर प्रथम दरवाजा मध्ये बांधलेले पळसाचे वाक सोडून वधू मंडपी प्रवेश करतो आता मात्र हे चित्र तेवढेच दुर्मिळ होत चाललेले आहे......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!