चार राज्यातील बहुमताचा भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
चार राज्यातील बहुमताचा भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
देशातील पाच राज्यांच्या निवडणुकाचे निकाल जाहीर झाले. पाचपैकी चार राज्यात भाजपाने विजय मिळविला. त्याचाच आनंद व्यक्त करण्याकरिता माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात मूल शहरातील गांधी चौकात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडून आणि पेढे वाटून विजयाचा जल्लोष साजरा केला.सोबतच विजयाच्या घोषणा देण्यात आले.
यावेळी मूल पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, माजी नगरसेवक प्रशांत समर्थ, अनिल साखरकर, चंद्रकांत आष्टणकर, अनिल साखरकर, प्रशांत लाडवे, महेंद्र करकाळे, विनोद सिडाम, प्रशांत बोबाटे, दादाजी येरणे, प्रवीण मोहुर्ले, प्रज्योत रामटेके, तन्मय झिरे, प्रमोद महाडोरे आदी भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!