गोंडवाना विद्यापीठ संलग्नित कर्मवीर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना शिबीर



प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल

गोंडवाना विद्यापीठ संलग्नित कर्मवीर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात चित्रपट निर्माते प्रकाश पाटील मारकवार यांनी भेट दिली. विध्यार्थ्यान सोबत हितगुज करताना त्यांनी सांगितले की विध्यार्थ्यानी अभ्यासाबरोबर आपल्या मधील सुप्त गुणांना देखील वाव दिला पाहिजे. गीत,संगीत,अभिनय या बाबी देखिल जोपासल्या पाहिजे. याप्रसंगी त्यांनी एक नवीन मराठी चित्रपट निर्मितीची घोषणा देखील केली.सदर कार्यक्रमात विध्यार्थ्याचा उत्साह दिसून आला.सदर कार्यक्रमात डॉ.डेझा यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविध्यालयाच्या प्राचार्य डॉ.अनिता वाळके यांनी भूषविले तर आभार डॉ. आगलावे यांनी प्रदर्शित केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!