ऐश्वर्याची आई वडील बघत आहे आतुरतेने वाट.... चिमूर तालुक्यातील चार विद्यार्थी शिकतात युक्रेन मध्ये...
चिमुर गुंजन प्रदीप लोणकर ही 17 फेब्रुवारीला नागपूर येथे दाखल. तर भिसी येथील खुशाल विपुल विश्वास...
जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आई-वडील तसेच युक्रेन मध्ये असणाऱ्या मुलींचे फोनद्वारे केली विचारपूस..
शंकरपुर... जगदीश पेंदाम
रशिया युक्रेन युद्धात भारतीय अनेक ठिकाणीची विद्यार्थी अडकले असून मागील पाच दिवसांपासून शंकरपूर येथील ऐश्वर्या खोब्रागडे तिचे आई-वडील आतुरतेने मुलींची दरवाज्यामध्ये वाट बघत आहे....
शंकरपूर येथील ऐश्वर्या प्रफुल खोब्रागडे ही विद्यार्थी 2017 पासून एमबीबीएस करण्यासाठी युक्रेन मधील टरनोपिल शहरांमध्ये शिक्षण घेण्याकरता गेली असून आता उद्भवलेल्या परिस्थितीमुळे गावाकडे यायला निघाले आहे..
500 च्या वर विद्यार्थी युक्रेनमधील हंगेरी या ठिकाणी प्रवेश केला असून या ठिकाणी त्यांची पोलीस विभागामार्फत जेवण्याची राहण्याची व्यवस्था सोमवारला करण्यात आली त्यानंतर त्यांना हंगेरी मधील बुडापेस्ट राजधानीमध्ये नेणार असल्याची माहिती ऐश्वर्या खोब्रागडे भ्रमणध्वनीवरून पप्पा मम्मी दिली असून, तुम्ही काळजी करू नका मी इकडं ठीक आहे असे सांगत त्यांचे मनोधैर्य वाढवलेले आहेत..
ऐश्वर्या खोब्रागडे युक्रेनला एमबीबीएस करण्यासाठी जाण्याअगोदर तिचे शिक्षण आंध्र प्रदेश मधील विजयवाडा येथील वियुरू येथे सायन्स अकरावी बारावी सीबीएससी म्हणून झालेले आहे..
जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी यशवर्या खोब्रागडेला युक्रेनमध्ये फोनद्वारे व शंकरपूर येथे तिचे आई-वडील यांना विचारपूस करून त्याच्याबद्दल माहिती घेतली आहे..
युक्रेन मध्ये चिमूर तालुक्यातील गुंजन प्रदीप लोणकर चिमूर, हर्षल बळवंत ठवरे चिचाळा शास्त्री, शंकरपूर येथील ऐश्वर्या प्रफुल खोब्रागडे,तर भिसी येथील खुशाल विपुल विश्वास हे विद्यार्थी शिक्षण घेत आहे, चिमूर येथील गुंजन लोणकर एम बी बी एस तिसऱ्या वर्षाला असून ती 17 फेब्रुवारीला नागपूर येथील सुखरूप घरी आलेली आहे तर, भिसी येथील खुशाल विपुल विश्वास हा सुद्धा आला असून तो सुद्धा 17 फेब्रुवारीला भिशीला येथे दाखल झालेले आहे....
ऐश्वर्याचे वडील प्रफुल खोब्रागडे यांनी केंद्राने विद्यार्थ्यांना सुखरूप घरी आणण्याकरीत मिशन गंगा या करीता भारतीय पंतप्रधान यांचे कौतुक केले असून आमची मुले सुखरूप घरी यावे यासाठी विनंती केली..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!