लोक विद्यालयात 'राष्ट्रीय विज्ञान दिन' साजरा
तळोधी(बा):
दि रूरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी सन १९६० द्वारा संचालीत लोक विद्यालय तळोधी(बा) येथे कोविड१९ च्या नियमांचे पालन करून 'राष्ट्रीय विज्ञान दिन' साजरा करण्यात आला.
या दिनानिमित्त विज्ञान अर्थात 'सायन्स'हा एक केवळ शिक्षण क्षेत्रातलाच भाग नाही तर यामधून जे बदल घडतात ते देशाला दिशादर्शक ठरतात. त्यामुळे विज्ञानाला एक वेगळे महत्व आहे. काळाच्या ओघात अनेक बाबींचे महत्व कमी होते विज्ञानाच्या माध्यमातून जे संशोधन केले जाते त्याचे महत्व अधिक कोरले जाते.
महान वैज्ञानिक भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भौतिकच्या गंभीर विषयावर एक महत्त्वपूर्ण शोध लावला होता. पारदर्शी पदार्थ मधून जाणाऱ्या प्रकाशांचा किरणात बदल करणारा हा बदल रामन यांनी शोधून काढला. त्यामुळे त्यांना १९३० साली भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते केवळ पहिले भारतीय नव्हते तर आशियातील पहिले व्यक्ती होते. हा शोध लावल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ १९८६ पासून देशभरात या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. १९५४ साली भारत सरकारने त्यांना सर्वोच्च भारत रत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.त्यामुळे सबंध देशात आज विज्ञान दिवस साजरा केला जात आहे असे प्रास्ताविकात विज्ञान शिक्षक संतोष नन्नावार यांनी सांगितले.
विज्ञान शिक्षक,महादेव टोंगे, संतोष नन्नावार व सोनल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान फलक निर्मिती स्पर्धा व विज्ञान रांगोळी स्पर्धा घेण्यात आला.वर्ग ५ ते ९ च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.स्पर्धेत यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे यावेळी पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक आर.बि. विधाते यांनी सांगितले की,विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, त्यांचे विज्ञानाप्रती आकर्षण वाढावे, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. देशभरात विज्ञान दिन साजरा करण्याचा मूळ हेतू हाच असल्याने आज देशभरात आजच्या दिवशी विज्ञान दिन साजरा केला जातो.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री.राजेश्वर विधाते मुख्याध्यापक,प्रमुख अतिथी जेष्ठ शिक्षक, पि.यु.गिरडकर,आर.डी.हांडेकर, आर.एम.निनावे, पी.बी.पाकमोडे, एस.व्ही. बालमवार,एम.व्ही.टोंगे,एस.व्ही.घोडे,कविता नागपूरकर, ज्योती मोहूर्ले,स्नेहा भरडकर, अजय सगळाम,एकनाथ भगत,संजय शेंडे, सुरेश कुंभरे कार्यक्रमाकरिता उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार शिक्षक प्रतिनिधी संतोष नन्नावार यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!