संस्थेचा आधारस्तंभ कोसळला..
तळोधी बा.(यश कायरकर):
दी रूरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरीचे गव्हर्निंग बॉडीचे अध्यक्ष श्री.गंगाधर विठोबाजी लांजेवार यांचे दिनांक 23/02/2022 ला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.मृत्युसमयी ते 87 वर्षाचे होते.वयाच्या 58 वर्षांपर्यंत शिक्षकी पेशाची नौकरी करीत असतांनाच ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून त्यांनी सन1960 मध्ये लोक विद्यालय तळोधी(बा),लोक विद्यालय गागंलवाडी व लोक विद्यालय सावरगाव येथे अथक परिश्रम घेऊन शाळा काढल्या.आज
दी रूरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी द्वारा उभे केलेले 3 वटवृक्ष डौलदारपणे उभे आहेत.या तिन्ही शाळांद्वारे तयार झालेले अनेक विद्यार्थी अधिकारी, डॉक्टर,इंजिनिअर देशात तसेच विदेशात कार्यरत आहेत.मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी संस्थेचे हित जोपासले.त्यांच्या मृत्यूमुळे संस्थेचे सचिव आर.एस.राऊत, अध्यक्ष व्ही.एस.तोंडरे,सदस्य ए.आर. नागमोती,व्ही.एस.बगमारे,डी.पि.समर्थ,अविनाश राऊत या संस्था परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले.तसेच तिन्ही शाळातील मुख्याध्यापक सर्व शिक्षक ,शिक्षीका व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त करीत आहेत.अशा संस्थेच्या आधारस्तंभाला ईश्वर चरणी शांती लाभो.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!