राष्ट्रीय मार्ग लगत असलेल्या कवडसी (देश) येथील रस्ता बनला जीवघेणा... 15 दिवसात रस्ता दुरुस्ती न केल्यास गावकरी करणार आंदोलन...




शंकरपुर..

     येथून जवळच असलेल्या असलेल्या राष्ट्रीय मार्ग क्रमांक 233 लगत कवडसी देश येथील मुख्य मार्गावरुन जाणाऱ्या  दयनीय अवस्था झाली असून, नागरिकांना त्रास सहन करून प्रवास करावा लागत आहे, या बाबत वारंवार निवेदन देऊन सुधा लोकप्रतिनिधि व प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत, 
  कवडसी देश हे गाव कांपा, शंकरपुर रोड वर असून कवडसी देश, दहेगाव, झरी कडे हा रस्ता जात कसून गावातील नागरिकांना दळणवळणाचे साधन, विद्यार्थ्यांना शिक्षणाकरता, आरोग्य, याकरीता मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे, रस्ता असून या रस्त्याला  जागोजागी मोठे मोठे खड्डे पडले आहेत, गावातील ज्येष्ठ नागरिकांना  सहीत शाळेतिल विद्यार्थ्यांना खुप त्रास सहन करावा लागत आहे, या संदर्भात मागील 3 वर्षों पासून वारंवार तोंडी व लेखी सूचना देऊन अजून पर्यंत प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे येत्या 15 दिवसात तात्काळ दुरुस्ती किवा नुतनिकर्न नं केल्यास कवडसी देश येथील समस्त नागरीक शंकरपुर कांपा रोड़ वर चक्का जाम आंदोलन करतील असा इशारा गावातील नागरिक राजकुमार माथूरकर, नितेश थेटे, गजानन वंजारी, कुणाल वंजारी, प्रमोद शास्त्रकार, वसंता गहुकर, मनोहर वंजारी, कैलास गाडगे, माणिक वंजारी, विनोद दोहतरे, हिवराज वैरागड़े, नीलकंठ गजभे गुलाब नवनागे, यांनी दिली आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!