परिस्थिती प्रतिकूल, जिद्द अढळ! पहिल्याच प्रयत्नात SETनंतर आता UGC NETमध्येही प्रा. प्रगती गडेवारांची बाजी”
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रा. प्रगती गडेवार यांचे घवघवीत यश; १८६ गुणांसह UGC NET उत्तीर्ण
मूल : अत्यंत प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीवर मात करत प्रा. प्रगती सुदेश गडेवार यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर UGC NET परीक्षा १८६ गुणांसह उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रतिकूल परिस्थितीमध्येही ध्येयापासून विचलित न होता प्रगती यांनी अभ्यासात सातत्य ठेवले. त्यांच्या मेहनतीचे आणि आत्मविश्वासाचे फलित म्हणून त्यांनी Assistant Professor तसेच Ph.D. साठी पात्रता मिळविली आहे.
विशेष म्हणजे, प्रा. प्रगती गडेवार यांनी यापूर्वीही पहिल्याच प्रयत्नात SET परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर आता UGC NET परीक्षेत मिळविलेले यश त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची, चिकाटीची आणि अभ्यासातील सातत्याची साक्ष देणारे ठरले आहे.
कठीण परिस्थितीला संधीमध्ये बदलत मिळविलेले हे यश विद्यार्थिनी, तरुण आणि संघर्षातून पुढे जाणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकारी आणि हितचिंतकांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त होत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!