मुल शिवटेकडी महाशिवरात्री उत्सव आनंदात साजरा
मुल शिवटेकडी महाशिवरात्री उत्सव आनंदात साजरा
प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल
दरवर्षी मुल येथील चंद्रपूर रोडवरील शिवटेकडी वर महाशिवरात्री चा उत्सव साजरा केल्या जाते, याही वर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा करण्यात आला, सकाळीच भगवान महादेवाच्या गजरात विधिवत पूजा करण्यात आली, दुपारी भजन मंडळी नि अनेक भजनांचा आस्वाद उपस्थितांना दिला, समितीच्या वतीने भाविकांना उपवास खिचडीचे वाटप करण्यात आले, अनेक भाविकांनी टेकडी चढून येत भगवान महादेवाची पूजा केली, स्वर्गीय पुंडलिक मस्के यांनी अनेक वर्षांपूर्वी इथे महादेवाची स्थापना केली होती, आज सदर ठिकाणावर जनतेची श्रद्धा बसली असून हजारो भक्त दर्शनासाठी येत आहेत, समितीच्या वतीने प्रभाकर भोयर, नंदकिशोर रणदिवे, किशोर कापगते, चेतन कवाडकर, प्रशांत समर्थ,प्रशांत लाडवे,राकेश ठाकरे,मनोज रणदिवे, युवराज चावरे,अक्षय गजापुरे, हेमंत शेंडे, प्रवीण मोहूर्ले,कुमुदिनी भोयर तसेच अनेक कार्यकर्त्यांनी सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!