विद्यानिकेतन येथे मराठी राजभाषा दिनाचे आयोजन



 चंद्रपूर (प्रतिनिधी) 

      श्री जैन सेवा समिती द्वारा संचालित  विद्यानिकेतन  दादावाडी चंद्रपूर येथे सिबीएससी विभागाच्या वतीने मराठी राजभाषा  दिनाचे  आयोजन करण्यात आले होते . यानिमित्ताने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागावी यासाठी 
प्राचार्य सौ. सपना पिट्टलवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन  करण्यात आले. यानिमित्ताने  मराठी विभागाच्या  सौ. सिमा संजय झाडे यांनी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. शाळेचे अध्यक्ष राज  रणजितजी पुगलिया यांनी सदर उपक्रमांचे कौतुक करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्यात. कोरोना नियमाचे पालन करत छोटेखानी स्वरूपात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!