काकाने पुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला; भोजराज बांगरे गंभीर जखमी
मूल | प्रतिनिधी :
मूल तालुक्यातील बोंडाळा खुर्द येथे काका-पुतण्यामध्ये झालेल्या वादातून काकाने पुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात भोजराज बांगरे (वय 35 वर्षे) हे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरंग बांगरे (वय 62 वर्षे) यांनी त्यांचे पुतणे भोजराज बांगरे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यात भोजराज यांना दुखापत झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेमुळे बोंडाळा खुर्द परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, हल्ल्यामागील नेमके कारण काय याचा तपास सुरू आहे.
या प्रकरणातील पुढील कारवाई आणि घटनेचे नेमके कारण पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!