जागतिक वन दिन्
तळोधी बा. (यश कायरकर )
आज दिनांक २१ मार्च २०२२२ रोजी उपवनक्षेत्र नवरगाव अंतर्गत येत असलेल्या नियतक्षेत्र नवर्गाव-१ मधील मौजा आलेसूर गावात श्री.व्ही.ए. सालकर व.प.अ. सिंदेवाही तसेच श्री.एस.वाय. बुल्ले क्षेत्र सहाय्यक नवरगाव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.एन. डी.शहारे वनरक्षक,श्री.एम.डी.घोडाम वनसमिती अध्यक्ष,श्री वाय.व्ही.निखारे शिक्षक जी.प.प्राथमिक शाळा आलेसूर,सौ.विद्या आर. आंबडारे ग्रा.प. सदस्या आलेसूर,श्री.आर.बी.आम्बडारे,श्री.रवींद्र नामदेव दुधकुरे,श्री.अमोल गणपत घुटके, श्री.आकाश मनोहर पंचभाई,श्री.विलास किसन मेश्राम PRT टीम आलेसूर,
श्री कार्तिक कुंभरे तसेच आलेसूर ग्रामवासियांच्या विशेष उपस्थितीत जागतिक वन दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात,लहान मुलांकडून वनाविषयक प्रश्नमंजुषा कार्यक्रम,भाषण,महिलांकडून जास्तीत जास्त राणभाजी विषयक माहिती देणाऱ्यांना प्रोहानात्मक बक्षिसे देण्यात आले, तसेच श्री.योगेश्वर विठ्ठल निखारे सर व श्री.एन.डी.शहारे वनरक्षक यांनी कार्यक्रमाला उपस्थितांना वनसंवर्धन व जतन करणे काळाची गरज कशासाठी असे...? असे सांगून वनसंवर्धनाचे महत्व पठवून दिले तसेच वनांत वणवणवा लावू नये म्हणून जनजागृती करण्यात आली.
गावात लोकांना वनविभागाप्रति आपुलकीची भावना असावी
याकरिता ५० शाळकरी विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक पेन व नोटबूक तसेच ५ विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस म्हणून रंगकांडी पेकेट,तसेच जास्तीत जास्त राणभाजीचे नावे व ओळख सांगणाऱ्यांना एका महिलेला १०० रु.तसेच सहभागी इतर तीन महिलांना प्रत्येकी ५० रुपये या प्रकारचे बक्षीसे
कार्यक्रमच्याअंती वितरण करून,कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार माणून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!