खरपुंडी येथे औ.प्र.संस्थेच्या रासेयो शिबिराचे उद्घाटन
खरपुंडी येथे औ.प्र.संस्थेच्या रासेयो शिबिराचे उद्घाटन
खरपुंडी जि.गडचिरोली ( प्रतिनिधी) - स्वतः ला विसरून दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी जो झटतो तो खरा सुखी होतो. म्हणून प्रशिक्षण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या व्यवसाय कौशल्याचा उपयोग ग्रामीण भागातील जनतेसाठी करावा , असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी खरपुंडी येथे केले. गडचिरोली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. ज्योत्स्ना मुकेश म्हशाखेत्री होत्या. उपसरपंच ऋषीजी नैताम, ग्रामपंचायत सदस्य बाळुभाऊ मेश्राम,दिनेश आकरे, वामन टिकले, श्रीमती अल्का गुरनुले ,सौ. निलिमा टिकले,सौ. प्रतिभा बारशिंगे,सौ. किरण नैताम, पोलिस पाटील सुधाकर मेश्राम, तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष सौ. रेखा भांडेकर , ग्रामसेवक संजिव बोरकर आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी सरपंच सौ. ज्योत्स्ना म्हशाखेत्री यांनी संस्थेच्या शिबिराचे स्वागत करून शिबिरासाठी शुभेच्छा दिल्यात.तर उपसरपंच ऋषीजी नैताम यांनी श्रमदानाचे महत्व सांगितले. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी भास्कर मेश्राम यांनी केले. सूत्रसंचालन संतोष बोंद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन बंडोपंत बोढेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटनिदेशक आनंद मधुपवार, नितीन श्रीगिरीवार, श्रावण खोडे , श्रीकांत पुराम, रासेयो स्वयंसेवक अक्षय कुर्जेकर, कु. शितल उंदिरवाडे, निदेशक मुरारी घाटूरकर, सतिशचंद्र भरडकर , कु. ताकसांडे, कु. मल्लेवार, कु. कवाडकर ,सौ. वाळके, गेडाम, प्रधान,खरवाडे आदींनी सहकार्य केले. दि. २० ते २६ मार्च पर्यंत चालणा-या या शिबिरात श्रमदान, घरगुती इलेक्ट्रिक मेंटेनन्स, वेल्डिंग वर्क, शिवन व कर्तन तसेच जनप्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. उद्या दुपारी झाडी बोली साहित्य मंडळाचे वतीने स्वच्छता, व्यसनाधिनता विषयावर कवी संमेलन होणार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!