मोह फूल देतात ग्रामीण जनतेला रोजगार... झाडाखाली गावकर्यांची गर्दी...
मोह फूल देतात ग्रामीण जनतेला रोजगार...
शंकरपुर....जगदीश पेंदाम
मोहफुले हे आदिवासीसाठी तसेच गावातील ग्रामीण जनतेसाठी रोजगाराचे साधन बनले असून या फुलांच्या माध्यमातून अनेक आदिवासींच्या दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण होत असतात.माघ फाल्गुन महिन्यामध्ये निसर्गामधील अनेक विशिष्ट झाडाला फुले,फळे लागायला सुरुवात होत असते त्यामध्येच मोहाच्या झाडाला सुद्धा मोहफुले लागायला सुरुवात झाली असून ग्रामीण भागामध्ये शेतातील तसेच गावालगत जंगलातील मोहाच्या झाडाखाली नागरिकांची गर्दी दिसून येत आहे...
माघ फाल्गुन महिना सुरु झाल्यानंतर मोहफूल पडायला सुरुवात होत असते त्याकरीता सकाळपासूनच फुलांच्या गळतीला सुरुवात होते हे गळती सूर्योदया अगोदरच सुरू होत असून सकाळीच 8 वाजेपर्यंत असते तर काही मोहाची झाडाची फुले ही दुपारच्या सुमारास सुद्धा पळत असतात, चिमूर तालुका हा जंगलव्याप्त असल्याने मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागांमध्ये आदिवासी समाज आहे व ते सर्व जंगलालगत असल्यामुळे मोहाच्या झाडाखाली सकाळीच पहाटेच्या सुमारास जाऊन मोहाची फुलं गोळा करत असतात मोहाच्या एका झाडा पासून जवळपास पंधरा ते वीस क्विंटल फुले मिळत असतात त्यामुळेच झाडाखालील मोहफुले वेचून आणल्यानंतर ती घरावर, जमीनीवर वाळू घातली जाते. चांगली वारलेली मोहफुले एका पोत्यात भरून ठेवले जातात ते एखाद्या व्यक्तीला किंवा बाजारात विकुन ग्रामीण जनता त्याद्वारे चांगला रोजगार निर्मिती करत असतात, व यातील काही मोहफुले घरात वर्षभर सांभाळून ठेवली जातात त्यापासून औषधे तयार करतात तर आजही ग्रामीण भागात भाकरी सुद्धा करतात तसेच मोहाच्या फुलापासून पोळ्याच्या दिवशी आजही ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या बैलाला पुरणपोळी बनवून दिली जाते, चिमूर तालुक्यात ग्रामीण भागात मोहफुल जमा करण्याचे काम सुरू असून मोहाचे एक झाड हजारो रुपयाचे रोजगार उपलब्ध करुन देत असते, त्यामध्ये झाडाच्या पानांपासून पत्रावळी बनवणे, मोह फूलापासून दारू,औषधी, इंधन मधून काडी मिळत असते, तर बिया ( टोरोटी ) मधून तेलसुद्धा निर्मिती होत असते फुलांचा हंगाम संपला नंतर या झाडाला फळे येतात ही फळे खाण्यासाठी वापरले जात असून त्यामध्ये औषधी युक्त गुणधर्म आहे तसेच आजही आदिवासी समाज देवदेवितांच्या पूजेकरीता मोहफुले मोठ्या प्रमाणात वापर करीत असतो व पाळीव प्राण्यांच्या विविध आजारावर मोहाच्या फुलांपासून बनवलेली औषधे उपचार म्हणून वापरली जाते.
या करीता मोठ्याप्रमाणात रोजगारासाठी वृक्षारोपणाचे आवश्यकता असून मोहाचे झाड बहुगुनी असल्यामुळे त्यापासून रोजगार तर मिळतोच शिवाय दैनंदिन वापरात तेलाचा वापर केला जाऊ शकतो, काही वर्षापासून जंगल तोडीच्या घटना सुरू आहे त्यामध्ये मोहाच्या झाडाची सुद्धा कमी होत असून या झाडाची जास्त वृक्ष लागवड करणे काळाची गरज निर्माण झाली आहे...
तालुक्यातील अनेक गावे जंगलात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांची भीती असून सकाळच्या सुमारास मोहफुले जमा करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून मोहफुल गोळा करणे सुरू आहे...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!