गोसे कालव्याच्या कामावरील ओ.एस.एस.प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ३ हायवास विना परवाना रात्रीच्या अंधारात मुरूमाची वाहतूक करतांना महसूल पथकाने पकडले

१८ लाखांचा दंड आकारला चिमूर तहसील ची सर्वात मोठी कारवाई

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - काही दिवसांपूर्वी ७ ते ८  ट्रॅक्टर वर अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असताना चिमूर तहसील च्या महसूल पथकाने तहसीलदार बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथक प्रमुख  उमाटे, अमोल घाटे, प्रवीण मेहरकुरे ,प्रवीण ठोंबरे, आकाश तुरारे ,रितेश आमटे, व विनोद गजभे कोतवाल या पथकाने सापडा रचून हि कारवाई केली.तशीच पुन्हा एकदा २३/०३/२०२२ ला गोपनीय माहितीच्या आधारे रात्रीच्या अंधारात सापडा रचून गोसे कालव्याच्या कामावरील नामांकित ओ.एस.एस. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ३ हायवास विना परवाना मुरूमाची वाहतूक करतांना पकडन्यात आले. आणि १८ लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे.हि चिमूर तहसील ची आजपर्यंत ची सर्वांत मोठी कारवाई असून या महसूल पथकाची सध्या तालुक्यात चर्चा रंगली आहे.असे म्हटले जात आहे कि कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या या गोसे कालव्याच्या कामावर चक्क चोरीचा मुरूमाचा वापर होतोय असे का ? या अगोदर सुद्धा याच गोसे च्या कालव्याच्या कामावर असे कित्तेक प्रकार झाले असावे ? याचाही वरिष्ठ पातळीवर विचार करावा व यांच्यावर सुद्धा सध्या चर्चित असलेल्या (ई.डी) ची चौकशी नेमावी अशीही चर्चा जनतेमध्ये सुरु आहे. मागील दिनांक. ८ जानेवारी २०२१ ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसेखुर्द धरणाची पाहणी केली.या कालव्याचे पाणी पूर्व विदर्भ म्हणजेच नागपूर , भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळेल आणि बंद असलेल्या कामास गती मिळावी यासाठी याची स्वतः मंत्र्यांनी पाहणी केली. व कामास गती मिळाली परंतु या कामावर चोरीचा महसूल वापरला जात आहे.याची जनतेला खंत वाटत असून महसूल विभागाची याकडे गोपनीय पाळत आहे.असेही यावरून सिद्ध होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!