मा.बंटीभाऊ भांगडीया यांनी दिला वासाळा मेंढा येथील रुग्णाला आर्थिक मदतीचा हात..
नागभीड (प्रतिनिधी)
नागभीड तालुक्यातील मौजा- वासाळा मेंढा येथील *श्री.दादाजी डिडरे* यांचा दोन वर्षाचा मुलगा *चि.अनुप डिडरे* याची काही दिवसांपासून प्रकृती बरी नव्हती. आणि प्रकृती अधिक खराब झाल्याने त्यास कुटुंबियांनी कुलुरकर हॉस्पिटल, नागभीड येथे रुग्णाला भरती केले परंतु परिस्थिती अभावी मोठा खर्च करणे शक्य नव्हते त्यामुळे रुग्णाचे कुटुंबीयांनी जास्त खर्च लागत असल्याने गावातील भाजपा पदाधिकारी यांच्याशी संपर्क करून सदर आर्थिक मदतीचा अर्ज भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे दिला असता कर्तव्यदक्ष,गरिबांचे कैवारी,*मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार साहेब* यांनी कसलाही विलंब न करता तात्काळ *मा.संतोष भाऊ रडके तालुकाध्यक्ष नागभीड* यांच्या मार्गदर्शनाखाली मदत पाठवून भाजपा पदाधिकारी मार्फत रुग्णाला आर्थिक मदत रुग्णाला देण्यात आली.
*रुग्णाला आर्थिक मदत देतांना-*
नितेश कुर्झेकार, कु.उज्वला माटे,गीताताई बोरकर तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!