प्रकाश मेश्राम खापरी धर्मु यांची "डाँ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय" पुरस्काराकरिता निवड
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर तालुक्यातील खापरी धर्मु या गावाची लोकसंख्या ६०० इतकी आहे याच गावातील रहिवासी प्रकाश मेश्राम यांची निवड ,जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाने सामाजिक क्षेत्रात गायक - कवी - (वादळ निळ्या क्रांतीचे) सामाजिक प्रबोधनकार , उत्कृस्ट सूत्रसंचालन ,प्रखर वक्ता ,शब्द निळ्या पाखरांचे, हा काव्यसंग्रह प्रसिद्द असून राजकारण क्षेत्रात सुद्धा विविध पदे अगदी कमी वयात भूषविली आहेत.यापूर्वी सुद्धा "त्रिमूर्ती ग्राहक आरोग्य आधार संस्था मुंबई च्या वतीने प्रकाश मेश्राम यांना "डायमंड ऑफ महाराष्ट्र" पुरस्काराने सन्मानित केले आहे आतापर्यंत तालुका, जिल्हा,राज्य स्तरीय १० पुरस्काराने सन्मानित केले असून आता दि. २७ मार्च २०२२ ला जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ घेत असलेल्या दीक्षांत समारंभात दीक्षा भूमी नागपूर येथे ,गिरीश गांधी,ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत,चंद्रपूर जिल्हा पालक मंत्री विजय वडेट्टीवार आणि मोठे साहित्यिक यांचे हस्ते पुरस्कार वितरण सोहळा ठीक १२ वाजता होणार आहे.या कार्यक्रमा निमित्ताने प्रा नरेंद्र मेश्राम,प्रा संदीप मेश्राम प्राचार्य कार्तिक पाटील ,प्रा राजूरवाडे, प्रज्ञा ताई,संदीप मेश्राम ,प्रदीप मेश्राम यांनी अभिनंदन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!