अज्ञात वाहनाच्या धडकेत नीलगाय ठार, चितेगांव बीटातील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत नीलगाय ठार, चितेगांव बीटातील घटना

मूल (अमित राऊत )

मूल तालुक्यातील राजोली उपवन क्षेत्रांतर्गत चितेगाव बीट क्षेत्रात मुख्य रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत चार वर्ष निलगायचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती सावली वनविभागाला देण्यात आली. वनविभागाची चमू घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
चितेगाव बीट जंगलव्याप्त असल्याने जंगलात विविध प्राणी आढळून येतात. याच परिसरात वाहनाच्या धडकेत बऱ्याच प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मूल सिंदेवाही मुख्य मार्ग असल्याने येथे नेहमीच वाहतुकही मोठी असते. त्यामुळे मार्ग ओलांडताना असे अपघात होत असतात. त्यामुळे अपघातात  अनेक प्राणी जखमी होतात तर कधी जीव गमवावा लागतो, हें विशेष.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!