गोठ्यात घुसून बिबट्याने केला बैल ठार, घोडाझरी लगत खडकी येथील घटना.
गोठ्यात घुसून बिबट्याने केला बैल ठार,
यश कायरकर: (जिल्हा प्रतिनिधी)
नागभीड वनपरिक्षेत्रातील, व घोडाझरी अभयारण्य लगत असलेल्या मांगरुड बिठातील खडकी येथील विलास अर्जुन मेश्राम यांच्या घरच्या गुरांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने बैल ठार केल्याची घटना आज रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास घडली. रात्री घडलेली ही घटना जेव्हा निदर्शनास आली तोपर्यंत बिबट्याने बैलाला ठार केले होते.
घोडाझरी अभयारण्य लगत असलेल्या खडकी येथील विलास मेश्राम यांचे घर गावाच्या मधोमध असल्याने व तिथे येऊन बिबट्याने ठार मारून काही भाग खाल्ल्याने. गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे खडकी हे गाव घरी अभयारण्याला लागून असल्यामुळे, गावाजवळ बिबट्या, वाघ सारख्या प्राण्यांचे वावर हे नेहमीच बाब झालेली आहे.
मात्र येत्या दहा पंधरा दिवसापासून हा बिबट्या गावातील कुत्री उचलून नेत असल्याच्या घटना घडतच आहेत. त्यातही आज गावाच्या मधोमध घुसून गुरांच्या गोठ्यात घुसून बैलाला ठार मारणे व तिथेच खाल्ल्यामुळे. गावातील लोकांनी या बिबट्याचे तात्काळ बंदोबस्त करावे असे मागणी केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच मांगरुड बिटाचे चे वनरक्षक , श्री विनोद चिकराम यांनी घटनास्थळी दाखल होऊन मोका पंचनामा केला व बैलाला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. व बैल मालकाला वन विभागात अर्ज करून नंतर बैलाचा योग्य तो मोबदला देण्यात येईल असे सांगितले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!