उपमुख्यमंत्री चशकात कराटे अँड फिटनेस क्लब मूल ची उत्कृष्ट कामगिरी
उपमुख्यमंत्री चशकात कराटे अँड फिटनेस क्लब मूल ची उत्कृष्ट कामगिरी
कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र द्वारा आयोजित "उपमुख्यमंत्री चषक : महाराष्ट्र राज्य आमंत्रित कराटे स्पर्धा-2022" बारामती (पुणे) येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे 25 ते 27 मार्च दरम्यान पार पडली सदर स्पर्धेत "कराटे अँड फिटनेस क्लब मूल" च्या तीन खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तिघांनीही उत्कृष्ट कामगिरी करत पदक मिळविले. साक्षी गुरनुले हिने कुमिते आणि काता प्रकारात अनुक्रमे एक सुवर्ण व एक कांस्य, विधी कोटकोंडावार हिने दोन्ही प्रकारात सुवर्ण व अमान खान याने काता प्रकार मध्ये रजत पदक मिळविले. सर्व मिळून 3 सुवर्ण 1 रजत आणि 1 कांस्य पदक अशी एकूण 5 पदके मूल च्या खात्यात आली. विजयी खेळाडू कराटे अँड फिटनेस क्लब मूल चे संचालक प्रशिक्षक इम्रान खान व निलेश गेडाम यांच्या मार्गदर्शनात नियमित सराव करतात.खेळाडूंना सेंसाई विनय बोढे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.तर खेळाडूंनी आपल्या विजयाचे श्रेय त्यांच्या मार्गदर्शकांना व पालकांना दिले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!