अतिक्रमणधारकांना मालकी हक्काची पट्टे देण्याची कार्यवाही करून घरापासून वंचित असलेले बेघर वासियानां घरकुल योजनेचा लाभ द्या भारतीय क्रांतीकारी संघटनेची मागणी
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - भारतीय क्रांतिकारी संघटनेचे उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा याचें नेतृत्वात नागभिड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यानां निवेदनाद्वारे बोथली, बामणी, तुकुम, शिवनगर, बामणी मधील अबादी तसेच अतिक्रमण धारकांना मालकी हक्काची पट्टे देण्याची कार्यवाही करून घरापासून वंचित असलेल्या बेघर वासियानां घरकुल योजनेचा लाभ द्या अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास भारतीय क्रांतीकारी संघटनेकडून उग्र आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा देण्यात आला.यावेळी नागभिड शहार प्रमुख आशाबाई सोनटक्के व इतर महिला उपस्थीत होत्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!