डॉ. मधुकर कोटणाके यांच्या साहित्याला झडीबोली साहित्य मंडळाचा पुरस्कार
राजुरा प्रतिनिधी
राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथील शिक्षक डॉ. मधुकर कोटणाके यांनी *कोलामगुड्याची शिक्षण यात्रा* हे ग्रंथ लिहिले असून या ग्रंथाला झडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर/ गडचिरोली च्या वतीने दिनांक 12/03/2022 ला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते जूनासुरला येथील कार्यक्रमात पुरस्कार देण्यात आला असून पालकमंत्री यांनी झाडी बोली मंडळाच्या वाचनालयाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
यावेळी डॉ. मधुकर कोटणाके यांनी उपेक्षित घटकांवर नेहमीच लिखाण करून त्यांचे प्रश्न मांडत राहण्याचे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, हरीचंद्रा बोरकर, बढोपंत बोडेकर, लक्ष्मण खोब्रागडे, रणजित समर्थ, गणेश खोब्रागडे, खुशाल टेकाम, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!