शिवनी येथे तेंदूपत्ता व वनवा याकरिता आढावा बैठकीचे आयोजन

शिवनी येथे तेंदूपत्ता व वनवा याकरिता आढावा बैठकीचे आयोजन
   
 तळोधी (बा.)     
     
       शिवनी येथे तेंदूपत्ता व वनवा याकरिता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
 सध्या तेंदूपत्ता मोहफुल वेचणीचा हंगाम सुरू होत असल्यामुळे या दिवसात जंगलाला वनवा लागून जंगलाचे व वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सोबतच वन विभागाला ही वनविभागाच्या  कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असतो. त्यामुळे आधीच काळजी घेऊन 'जंगलात वणवा लागू नये याकरिता घ्यावयाची काळजी व करायचे उपाय योजना' या संदर्भाने वनपरिक्षेत्र कार्यालय शिवनी येथे आढावा सभेचे आयोजन करण्यात आले.
  याकरिता परिक्षेत्रातील संपूर्ण  पि.आर.टी.चे सदस्य, संपूर्ण वनरक्षक, वन मजूर, व परिसरातील गाईड व यांना सभेत बोलवण्यात आले . ही सभा वनपरिक्षेत्र अधिकारी बी.के. तुपे साहेब यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात पार पडली.
 सोबतच संपूर्ण उपस्थित मंडळींच्या भोजनाची यावेळी व्यवस्था करण्यात आली. सहाय्यक ऊशेंडी व पेंदोर यांनीही सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!