महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे कपडे वाटप संपन्न
समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे सोमवार दि. २१ मार्च २०२२ रोजी श्री . जिवन भैय्याजी कोंतमवार यांचे घरी, गजानन महाराज मंदिर समोर, वार्ड क्रं . १४, मुल येथे गरजुंसाठी कपडेवाटप करण्यात आले.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणावमुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात.
यातलाच एक भाग म्हणून न्यासातर्फे कपडेवाटप करण्यात आले.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी न्यासाच्या वतीने सौ भारती कोंतमवार, सौ गिता कोंतमवार , सौ . विणा मार्तीवार आणि सौ . माधवी येलंकीवार यांनी परिश्रम घेतले . या उपक्रमासाठी श्रीमती अनिता कोंतमवार आणि श्रीमती सुलभा कोंतमवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
या उपक्रमाचा लाभ एकूण १६ गरजुंनी घेतला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!