मूल तालुका शिवसेना तर्फे शिवजन्मोत्सव सोहळा कार्यक्रम साजरा

 मूल तालुका शिवसेना तर्फे शिवजन्मोत्सव सोहळा कार्यक्रम साजरा



मुल तालुका शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य जंयती चे आयोजन शिवसेना तालुका कार्यालयात करण्यात आले होते  दिनांक 21 मार्च 2022 रोजी सोमवारला सकाळी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा व माल्यार्पण  मुल शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी केले तसेच आपल्या प्रास्ताविक भाषनात गेल्या वर्षी प्रमाणेच या हि वर्षी आपण त्याच जोमात त्याच उत्साहात पुन्हा भगवा ध्वज फडकवून छत्रपती शिवाजी महाराज जे अखंड हिंदुस्तानचे भाग्यविधाते यांची जंयती प्रत्येक वर्षातील तिथी प्रमाणे साजरी व्हावी हा मी ठरवलेला संकल्प आज प्रत्यक्षात उत्साहात साजरा होत आहे हे पाहून खरच आनंद होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व त्यांची शिकवण आपण प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवावी  या उद्देशाने आपण सर्व शिवभक्त मिळून एकत्रित येऊन शिवजयंती साजरी करत आहोत आणि मला शिवजयंती साजरी करण्यासाठी माझे सहकारी शिवसैनिक,युवासैनिक,महीला आघाडी तसेच मुल तालुक्यातील सर्व शिवभक्ताचे आभार मानले तसेच उपतालुकाप्रमुख रवी शेरकी ,सत्यनारायण अमरूदिवार यांनी आपले विचार विशद केले. त्यानंतर भव्य महाप्रसादाचे कार्यक्रमाचे आयोजन मुल तालुका कार्यालयासमोर  करण्यात आले होते अनेक महीला पुरूषांनी याचा लाभ घेतला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  मुल शिवसेना तालुका समन्वयक सुशी सरपंच अनिल सोनुले , युवासेना तालुकाप्रमुख संदिप निकुरे , महीला आघाडी तालुकाप्रमुख रजनी झाडे , शहरप्रमुख राहुल महाजनवार, शहर समन्वयक अरविंद करपे, उपशहर प्रमुख प्रविण मोहुर्ले, योगेश राऊत ,बाला इन्नमवार,श्रीनिवास कन्नुरवार,आशिष गुंडोजवार,विजय भोयर आदि शिवसैनिक उपस्थीत होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!