स्वास्तिक राईस मिल मुळे वस्तीतील जनतेचे आरोग्य धोक्यात,मिल परिसरातील लोकांना त्वचारोगाची साथ
तळोधी बा (यश कायरकर) :
नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील स्वास्तिक राईस मिल मुळे वस्तीतील जनतेचे आरोग्य धोक्यात आले असून, मिल परिसरातील लोकांना त्वचारोगाची साथ पसरत चाललेली आहे.
राइस मिल परिसरातील धानाचा भुसा छतावर, स्वयंपाक घरात जेवण भांड्यात , पिन्याच्या पाण्यात, जात आहे. त वारंवार बंदोबस्त करण्याची विनंती करूनही दुर्लक्षच केल्यामुळे ग्रामपंचायतीकडे महिलांनी निवेदन दिले. राईस मिल च्या दिवानजीचा अरेरावी पणामुळे व योग्य ती उपाययोजना न केल्याने परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर त्वचा रोग सतावत आहे.
तरीही तात्काळ घरादारात ऊडनार्या धुळ,भुसा यांचा बंदोबस्त करावा. संबंधित प्रदुषण नियंत्रण विभागाने व आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी करत शेजारच्या महिलांचा राईस मिल समोर आंदोलन करण्याचा इशारा सविस्तर सावरगाव येथील मुख्य बस स्टॉप जवळील वस्तीतील असलेली स्वस्तिक राईस मिल मिल परिसरातील परिवारात करिता धोकादायक ठरत आहे या राईस मिलमध्ये हे करतांना उडणाऱ्या धुरामुळे परिसरातील लहान मुले महिला पुरुष सर्वांना त्वचा रोगाचा त्रास होऊन लोकांना आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. दिवसभर उडणाऱ्या भुशाचा धूर हा शरीरावर वाढत असलेल्या कपडावर घरातील स्वयंपाक भांड्यांमध्ये पिण्याच्या पाण्यात छतावर दिवसभर उडत असतो यामुळे शरीराला त्रास होऊन त्वचा रोग वाढत चाललेला आहे. लोकांना आर्थिक व शारीरिक हानी सहन करावी लागत आहे . जेवण करताना जेवणाच्या पदार्थांमध्येही हा धूळ साचत असतो. त्यामुळे संपूर्ण दार बंद करूनच लोकांना जेवण करावे लागते. याबाबत परिसरातील महिलांनी ग्रामपंचायत कडे ही तक्रार केलेली होती. तेव्हा ग्रामपंचायत द्वारे मिल मालकाला धुराचा बंदोबस्त करण्याची ताकीद दिली. मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असून यामुळे आता योग्य ती कारवाई करून राईस मिल गावाबाहेर ढकलावी अशी मागणी करून राईस मिल समोर धरणा देण्याचा इशारा या महिलांनी दिलेला आहे. तरी प्रदूषण नियंत्रण विभागाने व आरोग्य विभागाने याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. सोबतच राईस मिल आणि धान्य साठविण्यासाठी गोडाऊन असल्यामुळे उंदीर आणि घुशी चा त्रास परिसरातील लोकांना सहन करावा लागत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!