शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जागतिक महिला दिन संपन्न.... महिलांचा सन्मान प्रथम घरातूनच व्हायला हवा- सोनाली पाटील
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जागतिक महिला दिन संपन्न....
महिलांचा सन्मान प्रथम घरातूनच व्हायला हवा- सोनाली पाटील
गडचिरोली (प्रतिनिधी)-
आजच्या आधुनिक युगात स्त्रि-पुरूष समानता केवळ कागदावरच राहु नये तर कृतीतून दिसली पाहिजे. याकरिता महिलांना घरातूनच सन्मान मिळायला हवा,असे प्रतिपादन जिल्हा पोलिस मुख्यालयातील पी.एस.आय. सोनाली पाटील यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आले होते, त्याप्रसंगी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके होते.
विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सहायक प्रकल्प अधिकारी चंदा मगर , रेखा पेंदाम , गटनिदेशक नंदकिशोर हनवतकर, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी भास्कर मेश्राम तसेच सर्व महिला कर्मचारी वृंद उपस्थित होते.
याप्रसंगी चंदा मगर म्हणाल्या, मुलींनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगला पाहिजे. जीवनात येणाऱ्या योग्य संधीचे सोने करण्यासाठी शिक्षणाकडे विशेषत: लक्ष दिले पाहिजे. प्राचार्य संतोष साळुंके यांनी महिलांच्या विविधांगी कार्याचे कौतुक करून महिलांचे नवपीढीला उत्तम संस्कार देण्याचे कार्य महान असल्याचे,ते म्हणाले.
प्रास्ताविक भास्कर मेश्राम यांनी केले तर समयोचित विचार संतोष बोंद्रे यांनी व्यक्त केले. नगर परिषद गडचिरोली द्वारा आयोजित स्वच्छता अभियानात उत्तम सेवा देणाऱ्या कु. राणी ताटीवार, कु. आचल चंदनखेडे, कु. पुजा भांडेकर आदींचा गौरव संस्थेच्या वतीने करण्यात आला. सिओई बिल्डिंग मध्ये देशाच्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने संस्थेत महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. रांगोळी स्पर्धेत १५ मुलींनी, बाल बॅलन्स स्पर्धेत १६ मुलींनी, चमचा गोळी स्पर्धेत १० मुलींनी, संगीत खुर्ची स्पर्धेत ३१ मुलींनी समभाग नोंदविला. त्यात विजेत्या ठरलेल्या मुलींना बक्षिसे देण्यात आली. परीक्षणाचे काम जयश्री कनोजकर, माधुरी वाळके, स्नेहलता घोडमारे, हिमेश्वरी कवाडकर, बीना बारसिंगे, ममता मल्लेलवार, जया भगत , करिश्मा टिंगूसले इत्यादींनी केले. सूत्रसंचालन मिना गांगरेड्डीवार यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली ताकसांडे यांनी केले. कार्यक्रमास गटनिदेशक बंडोपंत बोढेकर , श्रीकांत पुराम, चंदू समर्थ , पंकज गोडघाटे , हेमंत गेडाम ,मोनाली लाडे आदी तसेच सर्व स्री पुरुष कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!