तब्बल ४० वर्षानंतर आदिवासी सहकारी सोसायटी गिरगाव वर काँग्रेसचे युवा नेते .विनोदभाऊ बोरकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसची एकहाती सत्ता..!

तब्बल ४० वर्षानंतर आदिवासी सहकारी सोसायटी गिरगाव वर काँग्रेसचे युवा नेते .विनोदभाऊ बोरकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसची एकहाती सत्ता..!     
 
    
तळोधी बा. (यश कायरकर)               
नुकत्याच पार पडलेल्या  नगभि ड तालुक्यातील गिरगाव सेवा सहकारी सोसायटी वर  40 .वर्षापासून  भाजपा समर्थित गटाची असलेली मक्तेदारी संपवून  काँग्रेस च्या विनोद पा. बोरकर   यांचे नेतृत्वात  पूर्ण 12. ही उमेदवार निवडून आणून एक हाती सत्ता प्रस्थापित केली आहे.         गिरगाव येथे  मागील 40. वर्षापासून  सेवा सहकारी  संस्थेवर   भाजपची एक हाती सत्ता  कायम  अस्तित्वात राहत होती   परंतु  नगभिड  तालुक्याचे युवा व सर्वमान्य नेते  खरेदी विक्री सह. संस्था नगभिड चे संचालक , संजय गांधी निराधार योजना  ता. नगभिड चे अध्यक्ष व  स्थानिक लक्ष्मी  नागरी सहकारी  सहकारी पत संस्थे चे अध्यक्ष ,  विनोद पा.बोरकर यांनी आपली ताकत  पणाला लाऊन   गिरगाव , झाडबोरी, व कन्हाळगाव येथील कार्यकर्त्यांची  "एकजूट " तयार करून   विरोधी गटात  भाजपचे नेते मंडळी उमेदवार असतानाही त्यात  नगभिड कृशी उत्पन्न बाजार समितीचे  उपसभापती , बाजार समितीचे संचालक, व  जिल्हा परिषद सर्कल प्रमुख  या सर्वांना मात देत  . सर्व नवखे व युवा वर्गाला उमेदवारी देऊन   मोठ्या मताचे फरकाने निवडून आणून  करिस्माच केला आहे.                               एकूण  606.मतदानापैकी  576.मतदारांनी आपला  मतदानाचा हक्क बजावला  त्यात 14.  मते अवैध्य ठरली  . विजयी उमेदवारात. गैर आदिवासी सर्वसाधारण मध्ये  गिरगावचे विद्यमान उपसरपंच शरदराव  नानाजी सोनवाने,  गणपत आत्माराम सहारे, अनु. जाती.सुभाष किसन खोब्रागडे  इतर मागासवर्गीय सुखदेव परसराम डोंगरवार  ,राजू तुळशीराम मेश्राम, आदीवासी  सर्वसाधारण  मध्ये  श्रीहरी जणू आळे, दादाजी नामाजी जिवतोडे, सोमाजी  डोंगरु उईके, तंटू दोडकु ढोक, शामराव डोडकु ढोक नियालदास महादेव वलके   मोठ्या मताचे फरकाने निवडून आले  तर  आदिवासी महिला राखीव गटातून  यशोदाताई नैताम  यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत . या विजयानंतर  झालेल्या शोटेखानी सभेत. " सर्वसामान्य शेतकरी वर्गाला न्याय कसा देता येईल  यासाठी प्रामाणिक प्रयत्न  सर्वांच्या सहकार्याने व सर्वांच्या साक्षीने करणार असल्याची ग्वाही  विनोद बोरकर यांनी दिली .  व या विजयासाठी ज्यांनी  मेहनत घेतली  त्या सरवांसह मतदारांचे आभार मानले . यासाठी रमेश घुगुस्कर सरपंच कान्हाळगाव ,  लीलाधर बंसोड उपसरपंच कान्हाळगव ,प्रशांत गायकवाड सरपंच गिरगाव  यासह गिरगाव , कान्हाळगाव    , झडबोरी    येथील कार्यकर्त्यानी  अथक परिश्रम घेतले आहे .यासह  अनेकांचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!