जिथे अन्याय होतो, तिथे त्या घेतात रणरागिणीचे रूप !

जिथे अन्याय होतो, तिथे त्या घेतात रणरागिणीचे रूप !

महिला दिन विशेष : अन्यायग्रस्तांसाठी लढताना आपसूकच मिळते बळ भोजराज गोवर्धन, लोकमत न्यूज नेटवर्क मूल अन्यायाविरुद्ध लढा देत असताना सहजासहजी न्याय मिळत नाही, अनेकदा गरज नसतानाही, आंदोलनाचा पर्याय निवडावा लागतो, अशाच आंदोलनामुळे त्यांच्यावर अनेकदा गुन्हे दाखल झाले मात्र अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द काही कमी झाली नाही. कुणावर अन्याय झाल्याची माहिती कानावर पडताच त्या रणरागिणी होतात, अंगात बळ संचारते. अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे हेच एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असते, अन्यायग्रस्तांसाठी संघर्ष करणाऱ्या या रणरागिणीचे नाव आहे, वर्षा गुरुनुले मूल तालुक्यातील नांदगाव येथील गुरुनुले परिवारातील वर्षाचे प्राथमिक शिक्षण नांदगाव येथेच झाले, तर प्रौढ महिलांना केले शिक्षित, केवळ घरात बसून राहण्यापेक्षा अशिक्षित महिलांच्या कामी यावे, यासाठी त्यांनी प्रौढ शिक्षणाचे प्रशिक्षण घेऊन | अशिक्षित महिलांना प्रौढ शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षित करण्याचे महान कार्य त्यांनी लग्नानंतर काही दिवस केले. त्यांच्या या कार्यासाठी पती राजेंद्र लोनबले हे खंबीरपणे उभे असल्यानेच त्या आजही नागरिकांचे प्रलंबित प्रश्न समर्थपणे मार्गी लावण्यासाठी पुढे असतात.

माध्यमिक शिक्षण बेंबाळ येथे पूर्ण केले. १९९४ मध्ये चिरोली येथील राजेंद्र लोनबले यांच्याशी त्यांचा विवाह झाला, त्यांना आकाश आणि आशिष नावाचे दोन मुले आहेत, महिला, पुरुषांना नियमित बचतीची सवय लागावी यासाठी गेल्या २० वर्षापासून गावागावांत महिला, पुरुषांचे बचत गट तयार करून बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिलांच्या संपर्कात राहून त्यांना वेगवेगळी मदत करीत त्यांच्या

प्रशासनावरही वचक

प्रलंबित मजुरी, निराधार योजनेतील थकीत अनुदान, रेशन कार्ड, रोजगार हमी योजना यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील अन्यायग्रस्तांच्या मदतीला नेहमीच धावून जाण्याचे धाडस वर्षा लोनबले यांच्यामध्ये असल्यामुळे प्रशासनावरही त्यांचा चांगलाच वचक असल्याचे दिसते

केलेला आहे.

केवळ चूल आणि मूल यामध्येच रमून न जाता निराधार वृध्द, विधवा महिलांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणाऱ्या वर्षा लोनबले यांचे मूल तालुक्यात संघटन चांगले आहे. यामुळेच २०१७ मध्ये पार पडलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत त्या विजयी झाल्या. सध्या चिरोली पंचायत समिती गणाच्या त्या नेतृत्व करीत

कुटुंबामध्ये आनंद फुलविण्याचा प्रामाणिक प्रयत्न वर्षा करीत आहे. कठीण प्रसंगातही १५ वर्षांपूर्वी त्या गावागावांत फिरून बचत गटाच्या माध्यमातून महिला, पुरुषांचे संघटन तयार करण्यात व्यस्त होत्या.

श्रमिक एल्गारच्या तत्कालीन अध्यक्ष अँड. पारोमिता गोस्वामी यांच्या संपर्कात येऊन अन्यायग्रस्त व्यक्तीच्या समस्या प्रशासनाकडे मांडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!