पोरक्या भावंडांची आई-बाबा झाली ट्रस्ट
अपघाताने अख्ख्या कुटुंबाची केली राख रांगोळी, व पोरके झाले गौरी व भुषण हे बहिण - भाऊ
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपुर ने घेतले भावंडांना दत्तक
तालुका - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - ऑगस्ट २०१७ मधे आधी आई मरण पावली व डीसेंबर २०२१ मधे अपघातात बाबा मरण पावले. याच अपघातात घरी सांभाळ करणारी आजी गंभीर जखमी झाली व ती रुग्णालयात उपचार घेत आहे. आई-बाबा गेले व आजी रुग्णालयात, अशा परीस्थितीत पोरके झालेले बहिण-भाऊ गौरी व भुषण यांचा आधार बणून त्या मुलांना दत्तक घेवुन त्यांचे आई-बाबा होण्याचे कार्य केले आहे स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्टने कोण म्हणत समाज सोकावला आहे किंवा समाजातील दातृत्व वृत्ती हरपली आहे. स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट ही गावोगावी अनाथ व गरीब मुले, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजुर, महिला, रुग्ण आदींसाठी धावून येत आहे. व समाजात कुणी निराधार व वंचित राहू नये यासाठी आदर्शवत कार्य करीत आहे. वरोरा तालुक्यातील उखर्डा हे गाव या गावात आजी गंगा सुर्यभान पुसदेकर, वडील गजानन सुर्यभान पुसदेकर व आई रेशमा गजानन पुसदेकर हे शेतकरी कुटुंब कष्ट करुन आपली उपजीविका भागवत होते. यांना गौरी ब भुषण ही दोन मुले. अचानक या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला व सुखी कुटूंबाची राखरांगोळी झाली. ७ ऑगस्ट २०१७ मधे आधी रेशमा गजानन पुसदेकर यांचा मृत्यु झाला. त्यानंतर दोन्ही मुलांचा सांभाळ आजी व वडील करु लागले. अशातच २४ डीसेंबर २०२१ ला वडील व आजीचा अपघात झाला. यात वडील गजानन पुसदेकर यांचा मृत्यु झाला तर आजी गंगाबाई पुसदेकर ही गन्भीर जखमी असुन रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. या सर्व विदारक परीस्थितीत मुलगी गौरी व भुषण हे पोरके झाले. बहिण गौरी ही १३ वर्षांची असुन नुतन नेहरु विद्यालय, नागरी येथे सातव्या वर्गात शिकत आहे तर भाऊ भुषण हा १० वर्षांचा असुन जि.प. शाळा, उखर्डा येथे चौथ्या वर्गात शिक्षण घेत आहे. सध्या ही मुले काका राजु सुर्यभान पुसदेकर यांच्याकडे वास्तव्यास असली तरी घरची आर्थीक परीस्थिती हलाखीची आहे. घरखर्च, उपचार व शिक्षण यात तारेवरची कसरत सुरु आहे. हि बाब स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपुर यांना कळताच ताबडतोब ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवि शिंदे हे उखर्डा या गावी गेले. दोनही बहिणभावाची भेट घेतली व प्रत्येकी नगदी पाच हजार रुपयांची तात्काळ मदत करुन दोनही भावंडांच्या शिक्षणाचा व ईतर खर्च ट्रस्ट उचलेल अशी ग्वाही देवून दोन्ही भावंडांना ट्रस्टतर्फे दत्तक घेतले. यावेळी रवि शिंदे म्हणाले की आईवडीलांची जागा कुणीच घेवु शकत नाही मात्र काळ सोकावल्या जावू नये, समाजातील कोणताच अंग हा दुर्लक्षित व निराधार राहू नये, एव्हढाच पाकळीरुपी हातभार ट्रस्टतर्फे आम्ही करण्याचा प्रयत्न करीत आहो.यावेळी उखर्डा गावचे सरपंच प्रमोद फरकाडे, बाळू डोमकावळे, माजी सरपंच संजय महाजन, सामाजिक कार्यकर्ता दत्ता बोरेकर, राजु पुसदेकर, मनोज कुडे, बाळू भोयर, चरण मोडक, युवराज इंगळे आदी उपस्थीत होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!