वरोरा तालुका युवासेना आढावा बैठकीचा समारोप

तालुका - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )

वरोरा : - युवासेना  महाराष्ट्र राज्य सचिव वरून सरदेसाई यांच्या आदेशानव्ये युवासेना कार्यकारिणी सदस्य रुपेशदादा कदम ,युवासेना जिल्हा विस्तारक नित्यानंद त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात व वरोरा विधानसभा संपर्क प्रमुख संजय काळे यांच्या नेतृत्वात  वरोरा येथे तालुका युवासेना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर आढावा बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जीवतोडे,युवासेना जिल्हाप्रमुख हर्षलदादा शिंदे,जिल्हा युवा सेना सरचिटणीस मानिषभाऊ जेठाणी ,शिवसेना नगरसेवक दिनेशभाऊ यादव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.संपर्क प्रमुख संजयभाऊ काळे यांनी  युवासेना यामध्ये तरुणांची राजकीय व सामाजिक फौज असून 80 टक्के समाजकारण  व  20 टक्के राजकारण हेच ध्येय युवासेनेचे आहे.युवासेना प्रमुख कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे  यांचे विचार, व ध्येयधोरणे शहरासह ,ग्रामीण भागात  लोकांपर्यंत पोहचविणे हे प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांचे परमकर्तव्य ठरते.पदाधिकाऱ्यांनी युवासेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी गावागावात शाखा स्थापन करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन  संजयभाऊ काळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले आहे.शिवसेना नगरसेवक यांनी दिनेशभाऊ यादव यांनी शिवसेनेचे महत्व व उद्दिष्टे नेमके काय आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.युवासेनेत  प्रवेश  करणाऱ्या युवकांचे स्वागत व सत्कार उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. युवासेना समन्वय शुभम टोरे यांनी येत्या काही दिवसात सर्वांशी संपर्क साधून युवासेना शाखा स्थापन करण्याचे सांगितले.युवासेना बैठकीचे नियोजन वरोरा शहर अध्यक्ष प्रज्वल जानवे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन उप जिल्हाप्रमुख आलेख रट्टे व युवासेना तालुका प्रमुख व बोर्डा ग्रा.प.चे सदस्य भूषण बुरीले यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!