मूलच्या बाजार समितीत शेतकरी वार्यावर — संचालकाचे दुर्लक्षतेचा शेतकर्याना फटका
शेतकर्यांच्या हिताचा आव आणणारे बाजार समितीचे संचालकाच्या दुर्लक्षतेचा फटका गरीब शेतकर्याना बसत असल्यांने नुकसानग्रस्त शेतकर्यात प्रचंड असंतोष निर्माण होत आहे.
शेतात धानाचे उत्पादन झाल्यानंतर, शेतकर्यांनी धान विक्री करीता मूलच्या बाजार समितीत आणले. बाजार समितीत शासनाने मोठ—मोठे गोदामांसाठी अनुदान देवून गोदामाचे बांधकाम केले असतांनाही शेतकर्यांना आपले धान उघड्यावर ठेवावे लागत आहे. हे धान अवकाळी पावसामुळे भिजून शेतकर्यांची प्रचंड नुकसान होत असल्यांच्या घटना वारंवार होत आहे. मागील अनेक वर्षापासून पावसात धान भिजून शेतकर्यांचे नुकसान होण्यांची बाब नित्याचीच झाली असून, बाजार समितीचे संचालकाना मात्र शेतकर्यांची ही नुकसान दिसत नसेल काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.
आठ दिवसापूर्वीच बाजार समितीच्या अनागोदी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. लाखो रूपयाचे धान पाण्यात खराब झाले होते. याबाबत माध्यमात बातम्याही झडकल्या होत्या. मात्र तरीही बाजार समितीचे संचालकानी ही बाब गंभीरपणे घेतली नाही. दोन दिवसापासून येत असलेल्या पावसाचा अंदाजही हवामान खात्याने आधीच वर्तविला होता. तरीही बाजार समितीच्या शेतकर्यांप्रति उदासिन संचालक मंडळांनी या अंदाजाकडेही दुर्लक्ष केल्याचा फटका पुन्हा शेतकर्यांना बसला आहे.
मूल बाजार समितीत कॉंग्रेसची सत्ता आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पैशातून शेतकरी मेळाव्याचे नांवाने अनेक मोठे राजकीय मेळावे घेतल्या जातात, शेतकरी हिताच्या गप्पा केल्या जातात, प्रत्यक्ष मात्र शेतकर्यांचे नुकसान होत असतांना, त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करतात. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन कायद्यांचे विरोधात स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी वारंवार आंदोलन करून, पंजाबच्या शेतकर्यांना पाठींबा दिला, मात्र ज्या शेतकर्यांनी या संचालकांना निवडूण सत्ता दिली, त्या आपल्यांच शेतकर्यावर मात्र अन्याय करीत असल्यांची भावना स्थानिक शेतकर्यात दिसून येत आहे. झालेल्या शेतमालाची नुकसान भरपायी मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकरी हिताचे गप्पा मारणारे कॉंग्रेस प्रणीत बाजार समितीचे संचालक आता शेतकऱ्यांना न्याय देतील काय? हा प्रश्न विचारल्या जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!