जिजाऊ ब्रिगेड मुल व राष्ट्रमाता कुणबी महिला महासंघच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन



प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल 

जिजाऊ ब्रिगेड मुल व राष्ट्रमाता कुणबी महिला महासंघ च्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ललिता कुडे , मंदा कोटगले यांनी फोटोला मालार्पण करून अभिवादन केले. सावित्रीबाई फुले यांच्या जिवनातील संघर्ष आपल्यासाठी प्रेरणादायी असून त्यातून शिकण्यासारखे आहे. स्त्री शिकली तर कुटूंब सुधारेल असा वसा सावित्रीबाई नी दिला. सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या प्रयत्नांमुळे आज महिला उच्च पदावर पोहचू शकल्या. त्यांचे नित्य स्मरण मनात ठेवून शिक्षणासाठी अडचणीत असणाऱ्या मुलांमुलीसाठी मदतीचा हात पुढे करा. असे आवाहन प्रा रत्नमाला भोयर यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी जिजाऊ ब्रिगेड च्या अध्यक्षा संजिवनी वाघरे, सचिव कल्पना नरूले, सदस्या अर्चना चावरे, पपीता झरकर, सुनीता वादाफळे, वंदना वाकडे, किर्ती बांगरे, विद्या बोबाटे, भावना चौखूंडे, सुजाता नागापूरे, सूलोचना तांगडे सोनू म्हस्के ,सपना निमगडे ,यासह बऱ्याच महिला उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!