जनकापूर येथे क्रांतीज्योती सावित्रीआई फुले जयंती महोत्सव साजरा

जनकापूर येथे क्रांतीज्योती सावित्रीआई फुले जयंती महोत्सव साजरा 


तळोधी(बा.) 
        
क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांची जयंती आज तालुक्यातील जनकापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला जि.प.सदस्य खोजराम मरसकोल्हे, जि.प. सदस्य सजंय गजपूरे, सरपंच वैशाली गायधने, उपसरपंच महेश रामटेके, पत्रकार राहुल रामटेके, राकेश काशिवार,महिला सघांचे अध्यक्षा शुभांगी सुर्यवंशी,शशिकला बावनकर, प्रामुख्याने उपस्थित होत्या. महिला सक्षम झाल्या पाहिजे तर देशाची उन्नती होईल स्त्रियांना स्वातत्र्याचे सर्व अधिकार  मिळावे म्हणून सावित्री नी स्त्रिमुक्ती आंदोलनाचे रणशिगं फुकंले आणी म्हणून आज स्त्रियां स्वाभिमानाने जगत आहेत हे सावित्रीची देण आहे. असे विचार जि.प.सदस्य संजय गजपूरे यांनी व्यक्त केले. तर. स्त्रियांवर अन्यय अत्याचाराचे वेळी स्त्रियांनी एकजूटिने समना करण्याची गरज   आहे. कारण आज प्रत्येक स्त्रि हि माझी कोणीतरी आई, बहिन,समजली पाहिजे तरच स्त्रि जिवनावरील अन्यय दुर होण्यास...मद्त होईल. आणी असे झाले तरच सावित्रीची जयंती साजरी झाल्याच समाधान समाजात दिसेल असे विचार जि.प.सदस्य खोजराम मरसकोल्हे यांनी व्यक्त केले. यावेळी मचंकावर ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी मसराम, शुभांगी डाहारे, शारदा सुर्यवंशी, महिला सघांचे सुरेखा काशिवार,शाळा समिचीच्या अध्यक्षा रसिका बोरकर, माविम प्रेरक सत्यवती रामटेके, सेविका बेबिताई बोरकर, अश्विनी पडोळे, कमळजा चुटे, रसिका गायधने, आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सचांलन व प्रास्ताविक देवता सुर्यंवंशी हिने केले तर आभारप्रदर्शन दर्शना गुरूनुले हिने केले. क्रार्यक्रमाला बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!