मूल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य गरजुंना ब्ल्यांकेटचे वाटप
मूल प्रतिनिधी
मूल येथिल वार्ड क्र.१६ येथील झोपडपट्टी वसाहतीत गोर-गरीब गरजुंना मूल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त ब्ल्यांकेट वाटप कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. सदर ब्ल्यांकेट वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष श्री. सुमीत सुरेशराव समर्थ यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रमाची सुरवात क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित
करण्यात आले.
सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांकरीता केलेल्या विविध कार्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत समर्थ, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष किसनराव वासाडे, शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे , शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे , जेष्ठ नेते प्रभाकर धोटे, हेमंतजी सुपणार उपस्थित होते. यात प्रमुख पाहुण्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यांची माहिती व मार्गदर्शन देण्यात आले.
कार्यक्रमात सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वाघमारे यांनी केले. व आभारप्रदर्शन संजय मोहूर्ले यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किसनराव वासाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, कार्याध्यक्ष महेश जेंगठे, हेमंतजी सुपणार, प्रा.प्रभाकर धोटे, वाघमारे सर, संजू मोहूर्ले, सुरेंद्र बावनकर ,प्रदीप देशमुख, परचाके , आदींनी परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!