बिनविरोध निवडणुका या ग्रामीण भागातील सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी आवश्यक - रवि शिंदे

पिपरी व घोनाड - कोच्ची सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध

रवि शिंदे यांच्या सहकार क्षेत्रातील प्रदिर्घ अनुभवाचा सेवा सह. संस्थांना लाभ 

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - साधारणत: ग्रामीण भागात निवडणुका कोणत्याही असो, दोन पार्ट्या, दोन पक्ष, दोन गट व दोन विचार आमनेसामने येतात. यात गटातटाचे राजकारण होवून गावात हेवेदावे तयार होतात. व सामाजिक स्वास्थ्यावर त्याचा परीणाम होतो. अशातच बिनविरोध निवड प्रक्रिया पार पाडून नविन आदर्श निर्माण करण्याचे कार्य पिपरी व घोनाड या दोन गावातील सेवा सह. संस्थांनी केले आहे.चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवि शिंदे यांनी त्यांच्या सहकार क्षेत्रातील प्रदिर्घ अनुभवाचा उपयोग करुन सहकारी संस्थेच्या निवडनुका बिनविरोध करुन ग्रामीण भागात आदर्श रचण्याचे कार्य केले. या सहकारी संस्था शेतकरी, महिला यांचा आर्थीक स्तर उंचावण्यासाठी कार्यरत असतात. त्यामुळे सहकारी संस्था ही सर्वसमावेशक व सर्वांना घेवुन चालणारी असावी, यासाठी हा प्रयत्न रवि शिंदे यांनी ही निवड प्रक्रिया बिनविरोध करुन केला आहे. बिनविरोध निवडणुका या ग्रामीण भागातील सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी आवश्यक असल्याचे मत यावेळी रवि शिंदे यांनी मांडले. आज (दि.१४) ला सहकारी संस्थेमार्फत घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख होती. सदर अर्ज दुपारी ३.०० वाजेपर्यंत सादर करावयाचे होते. पिपरी सेवा सहकारी संस्था मर्या. पिपरी र.न. २८० व घोनाड-कोच्ची सेवा सहकारी संस्था मर्या. घोनाड र.न. २५० या दोन  संस्थेकरिता त्या-त्या संस्थेतील सदस्यांनी व त्या-त्या गावातील नागरिकांनी एकमताने संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी या उद्देशाने स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विदयमान संचालक रवींद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करून प्रत्येकी दोनही संस्थेमध्ये १३ बिनविरोध सदस्यांची नेमणूक करण्यात आली. त्यामध्ये पिपरी सेवा सहकारी संस्थेत भास्कर बाजीराव खुटेमाटे (सर्वसाधारण गट), विलास नामदेव दरवे (सर्वसाधारण गट), रवींद्र श्रीहरी खुटेमाटे  (सर्वसाधारण गट), दिलीप विठोबा खुटेमाटे (सर्वसाधारण गट), संदीप भाऊराव खुटेमाटे (सर्वसाधारण गट), घनश्याम जनार्धन डोंगे, (सर्वसाधारण गट), सचिन दिवाकर खुटेमाटे  (सर्वसाधारण गट), कमलाकर मनोहर क्षीरसागर (सर्वसाधारण गट), गुणवंत तानबा खुटेमाटे (सर्वसाधारण गट), सुनीता अनंता दर्वे (महिला राखीव), सुनीता भोजराज डाखरे (महिला राखीव), रत्नमाला सुरेश आस्कर (वि.भ.ज.), महादेव सुदाम नगराळे (अनु.जाती) यांची एकमताने निवड करण्यात आली.तर घोनाड-कोच्ची सेवा सहकारी संस्थेत विजय महादेव आवारी (सर्वसाधारण गट), राजू आनंदराव पोतराजे (सर्वसाधारण गट), शरद वारलु शेरकी (सर्वसाधारण गट), अशोक सीताराम मारेकर (सर्वसाधारण गट), शशिकांत जालंधर भोयर (सर्वसाधारण गट), युवराज अविनाश आवारी (सर्वसाधारण गट), राजेश बालाजी मत्ते (सर्वसाधारण गट), विनायक मुरलीधर ठोंबरे (सर्वसाधारण गट), धनराज छगन भोयर (सर्वसाधारण गट), विजय मारोती ढगे  (वि.भ.ज.), आशा अशोक उरकुडे (महिला राखीव), प्रीती प्रवीण उमरे (महिला राखीव), सुरेश पांडुरंग तेलंग (अनु.जाती) यांची एकमताने निवड करण्यात आली.
        याप्रसंगी पं.स. भद्रावतीच्या माजी सभापती विद्याताई कांबळे, सतीश कांबळे, पाणवडाळाचे सरपंच प्रदीप महाकुलकर, प्रदीप देवगडे, सुरेश आस्कर, अनंता दर्वे, हेमंत बोबडे, भोजराज डाखरे, संदीप कुटेमाटे, अनुप कुटेमाटे, कृष्णा दर्वे, भास्कर ताजने, विलास घोटकर, सुनील मोरे, घोनाडचे सरपंच महेंद्र भोयर, संतोष तुराणकर, जगदीश चौधरी, महेंद्र भोयर यांची उपस्थिती होती.या प्रसंगी बोलतांना स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथाचचंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विदयमान संचालक रवींद्र शिंदे यांनी सांगितले की सदर निवडणूका या बिनविरोध झाल्यामुळे सहकारी क्षेत्रात एक चांगला संदेश गेला. तसेच सहकारी संस्था या शेतकऱ्यांचे आर्थिक स्तर वाढविण्याचे काम करत असतात. अशा संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!