सांबराची शिकार करणारे अकरा आरोपी गजाआड... शंकरपूर वन विभागाची कारवाई..
सांबराची शिकार करणारे अकरा आरोपी गजाआड...
शंकरपूर...जगदीश पेंदाम
येथून जवळच असलेल्या पिंपळगाव येथे वन्यजीव सांभर ची शिकार करून मास विकतांना 11 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे ही कारवाई सोमवारी दुपारी एक च्या दरम्यान वाईड लाइफ प्रोडक्शन सोसायटी ऑफ इंडिया यांच्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेली आहे येथून जवळच असलेल्या पिंपळगाव व नवतळा येथे जंगल लागू असून या जंगल परिसरातील मदनापूर तलाव क्षेत्रात पाळीव कुत्र्या च्या साह्याने सांभराची शिकार केलेली आहे हे मास गावात आणून विक्री करण्याचा बेत होता याबाबतची माहिती वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया व स्थानिक तरुण पर्यावरणवादी मंडळ ला मिळताच त्यांनी वन विभागाला याची माहिती दिली त्या माहितीनुसार नवतळा येथील शंकर मसराम यांच्या घरी धाड मारली असता सांबराची भाजी शिजत होती ती भाजी जप्त करून त्याला बोलते केले असता शिकार करणारे मुख्य आरोपी हे पिंपळगाव येथील असल्याने त्यांच्या घरी धाड मारली त्या धाळीत तीन किलो शिजविले मास, तीन किलो कचे मास, चामडे,डोके,पाय, सत्तुर, कुराड, विळा, आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे...
या कारवाईत पिंपळगाव येथील अरविंद तुकाराम ननावरे, निखिल महादेव जीवतोडे, अवचित सुभाष बारेकर,राजू घुघुसकर ,रुपेश धारणे ,एकनाथ बारेकर ,सुरज हरी घरत ,अभिषेक चंद्रभान नन्नावरे, तर नवतळा गावातील शंकर मसराम, राजू वाढई ,रामू राजेराम कुमरे यांना ताब्यात घेतले असून वन विभागाची कारवाईची सुरू आहे वृत्त लिहेपर्यंत ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी नैताम यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्र अधिकारी यु बी लोखंडे, वनरक्षक नैताम, वनरक्षक सोनुले प्रदीप ढोणे आदी तपास करीत आहे..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!