जि.प. सेस फंडाचे लाभार्थी पदाधिकारीच! फिस्कुटीतील ‘त्या’ एकाच जातीच्या लाभार्थ्यांमुळे सर्वत्र संताप
जि.प. सेस फंडाचे लाभार्थी पदाधिकारीच! फिस्कुटीतील ‘त्या’ एकाच जातीच्या लाभार्थ्यांमुळे सर्वत्र संताप
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूकीत ‘सबका साथ-सबका विकास’चा नारा देवून विकासाची सर्वांना समान संधी देण्यांचा मनोदय व्यक्त केला असला तरी, भाजपाच्याच ताब्यातील जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्यांना मात्र पंतप्रधान मोदी यांचे विचार मान्य नसल्यांचे जि. प. सेस फंडाच्या लाभार्थ्यांची यादीतून दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्यांनी ‘सबका साथ, अपना विकास’ असा नवा नारा तयार केला आहे.
या योजनेत अनेक जि.प., पं..स. तसेच ग्राम पंचायत पदाधिकार्यांनी गरीब शेतकर्यांचा विचार न करता, स्वतःच्याच कुटूंबाला लाभ देण्यांचा निदंनीय प्रकार घडवून आणला आहे. या योजनेत एकाच व्यक्तीला दोन-दोन लाभ देण्यात आले आहे, तर एकाच कुटूंबात चार-चार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्यांने, लाभार्थी निवड समिती निवड करतांना ‘डुलक्या‘ घेत होती काय? असा आरोपही केला जात आहे.
जि. प. कृषी विभागांनी जाहीर केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत जिल्हा भरातून 542 लाभार्थ्यांना ताडपत्री व इतर या योजनेचा लाभ देण्यात आला. यात तब्बल 30 टक्के लाभार्थी (165 लाभार्थी) हे मूल तालुक्यातीलच असून उर्वरित 14 तालुक्याच्या वाट्याला 70 टक्के लाभ मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरूनुले यांचा मूल हा तालुक्यातील लाभार्थ्यांवर जिल्हा परिषद मेहरबान झाली असावी असे मत आता व्यक्त होत आहे.
मूल तालुक्यातही लाभाचे वाटप असमान तत्वावर, आपल्याच जात बांधवाना प्राधान्य देत, एकाच कुटूंबात चार-चार योजनांचा लाभ देण्यात आला. ऐवढेच नाही तर, एकाच व्यक्तीला एकाच वेळी दोन-दोन योजनाचा लाभ देवून नियम-कायद्याची एैसीतैसी करण्यात आली आहे. फिस्कुटी, नांदगांव, बेंबाळ, दाबगांव हे चार लोकप्रतिनिधीचे गांव वगळता उर्वरित गावातील लाभार्थांची संख्या एक आकडीच आहे. अनेक मोठ्या गावात तर केवळ एकच लाभार्थी असून, तालुक्यातील 111 गावापैकी केवळ 29 गावानांच या योजनेत लाभ मिळाला आहे.
जि.प. व मूल पं.स.मध्ये भाजपाची सत्ता आहे. मात्र कॉंग्रेसचे चिरोलीचे सरपंच कुटूंबातील शालीक दहिवले यांना 3 एचपी मोटरपंप व बॅटरी चलीत स्प्रे पंप असे दोन लाभ देण्यात आले. तक्रार होवू नये यासाठी चिरोलीचे शालीक दहिवले यांना 3 एचपी मोटरपंपचा लाभ देतांना, त्यांना दहेगांवचे रहीवासी करण्यात आले. शालिक दहीवले कॉंग्रेसचे असले तरी, पं.स.सभापती चंदू मारगोनवार यांचे मित्र असल्याचा फायदा त्यांना मिळाल्याची चर्चा पंचायत समितीत आहे. जि.प. अध्यक्षा सौ. संध्या गुरूनुले यांचे खंदे समर्थक उश्राळाचे सरपंच देवानंद नामदेव नर्मलवार यांना बॅटरी चलित स्प्रे पंपाचा लाभ देण्यांसाठी त्याला फिस्कुटीचे रहीवासी करण्यात आले.
फिस्कुटीत एकाच जातीचे 32 लाभार्थी
मूल तालुक्यातील फिस्कुटी येथे सर्वाधिक 32 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. या गावात माळी समाज मोठ्या प्रमाणावर असले तरी, इतरही समाज आहे. मात्र लाभार्थी केवळ माळी समाजाचेच निवडून इतरांसोबत भेदभाव केल्या गेला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरूनुले या मुळच्या फिस्कुटीच्या, त्यांचे पुत्र नितीन गुरूनुले हे सध्या फिस्कुटीचे सरपंच आहेत. हे माळी समाजाचेच असल्यांने लाभार्थी निवडीत पदाधिकाÚयांचा हस्तक्षेप अधोरेखित होत आहे. जि.प. अध्यक्षपद हे एकाच जातीकरीता आहे काय? असा प्रश्न आता विचारल्या जात आहे.
'या' पदाधिकार्याचे बल्ले—बल्ले
तालुक्यात सर्वाधिक लाभार्थाना लाभ मिळवून देण्यांत जि.प.सदस्य शितल प्रशांत बांबोळे (नांदगांव-22), पं.स सभापती चंदू मारगोनवार (बेंबाळ-13), जि.प.सदस्य पृथ्वीराज अवताळे (दाबगांव -12) आघाडीवर आहेत.
मूल तालुक्यातील गाव निहाय लाभार्थी
फिस्कुटी (32),नांदगांव (22), बेंबाळ (13), दाबगांव ((12), गडीसुर्ला (8), बोंडाळा बु.(7), मारोडा (6), चिरोली (4), राजोली (4), करवन (4), चिमढा (3), उश्राळा (3), बेलघाटा (2), गोवर्धन (2), नवेगांव बु. (2), सिंतळा (2), भंजाळी (2), कांतापेठ (1), सुषी (1), चितेगांव (1), पडझरी (1), सोमनाथ (1), ताडाळा (1), जुनासुर्ला (1), बाबराळा (1), कोरंबी (1), दुगाळा (1), केळझर (1), चांदापूर (1) कंसातील आकडे गावातील मंजूर लाभार्थ्यांची संख्या दर्शवितात.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!