स्वामी विवेकानंद मुल येथील शिक्षक अरुण गाजेवार यांचे दुःखद निधन





प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल

स्वामी विवेकानंद मूल येथिल उत्कृष्ट शिक्षक अरुण गाजेवार सर वय 48 यांचे हृदयविकाराच्या आजाराने काल रात्री 10.30 च्या सुमारास दुःखद निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसापूर्वी त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना बोकारे हॉस्पिटल येथे नेण्यात आले. त्यांनतर उपजिल्हा रुग्णालय मुल येथे येत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी त्यांना ईश्वर या दुःखातून निघण्याचं बळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.



1 टिप्पणी:

झिंदाबाद!