साहित्यामुळे संघर्षाला बळ मिळते- अॕड.पारोमिता गोस्वामी
येनबोडी येथे प्रशांत भंडारे यांच्या ‘कवडसा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
---------------------------
साहित्यामुळे संघर्षाला बळ मिळते- अॕड.पारोमिता गोस्वामी
येनबोडी जि. चंद्रपूर
(प्रतिनिधी).
झाडीबोली साहित्य मंडळ शाखा बल्लारपूर च्या वतीने कर्मविर विद्यालय येनबोडी कवी प्रशांत भंडारे यांच्या ‘कवडसा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. ह्या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॕ.धनराज खानोरकर होते तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ समाजसेविका अॕड.पारोमिता गोस्वामी तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रभाताई वासाडे, झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर, कृषी जीवन विकास प्रतिष्ठान चे सचिव विजय पा. वासाडे, डॉ. राज मुसने , ज्येष्ठ पत्रकार विजय सिद्धवार , तर भाष्यकार म्हणून दिलीप पाटील तसेच लक्ष्मण खोब्रागडे लाभले होते. ‘कवडसा’ चे रचयिते प्रशांत भंडारे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी जिल्हा शाखेच्या वतीने प्रशांत भंडारे यांचा सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.याप्रसंगी उद्घाटक अॕड.पारोमिता गोस्वामी म्हणाले की, कवडसा काव्यसंग्रहामधून लोकसंस्कृतीचे दर्शन घडते.तसेच समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात येणाऱ्या संघर्षाला साहित्यातून बळ मिळते, असे त्या म्हणाल्या. तर याप्रसंगी डॉ. खानोरकर म्हणाले की झाडीबोली साहित्य चळवळीने आपल्या वैभवशाली संस्कृती चे जतन करण्यासाठी कार्य केले. याप्रसंगी अरुण झगडकर म्हणाले की, झाडीबोलीनी अनेक शब्द भाषेला दिलेले आहे म्हणून भविष्यात भाषेचा मापदंड बोलीच्या तराजूतच तो लावावा लागेल. साहित्य निर्मितीमुळे सामाजिक संघटनेच्या कार्याला विशेष पाठबळ मिळत असते, असे स्वानुभव ज्येष्ठ पत्रकार विजय सिद्धावार यांनी मांडले. आदी उपस्थित मान्यवरांनी विषयानुरूप समयोचित विचार व्यक्त केले.
दुसऱ्या भागात कवी अरूण झगडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रा.विनायक धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कविसंमेलनात संजिव बोरकर, उपेंद्र रोहनकर,शितल कर्णेवार,संतोष मेश्राम,नेताजी सोयाम,मंदाकिनी चरडे, प्रदीप मडावी, सुनील पोटे, मनिषा मडावी, वृंदा पगडपल्लीवार, दिलीप पाटील, परमानंद जेंगठे, नंदकिशोर मसराम, जयंती वनकर, सुजीत मांदाडे,किरण लोडे,वंदना हटवार,संगिता बांबोळे,सुधाकर कन्नाके,अनिल आंबटकर, योगिराज उमरे आदींनी स्वरचित कविता सादर केल्यात. शासनाच्या निर्देशानुसार कोरोना नियमांचे पालन करुन छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन डाॕ.अर्चना जुनघरे आणि विरेनकुमार खोब्रागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन दुशांत निमकर यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!