राष्ट्रीय गणित दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा संपन्न

राष्ट्रीय गणित दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा संपन्न



मूल (अमित राऊत )

विज्ञान आणि संस्कृती यांचा अपूर्व संगम घडवत स्थानिक नवभारत कन्या विद्यालय मुलच्या वतीने राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणितावर आधारित रांगोळी स्पर्धा घेतली. या स्पर्धेत ६० विद्यार्थ्यीनीनी सहभाग घेतला. 
गुणाकार, भागाकार, रामानुजन यांचे चित्र, भूमिती, गणित समीकरणे यांच्या रंगीत रांगोळ्या यानिमित्ताने रेखाटल्या. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. याच निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्तानेही रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.  या स्पर्धेत तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कलाशिक्षक कातिक नंदुरकर, शैलेश देवाडे, धीरज धोंडरे यांनी परिश्रम घेतले. या यशस्वी उपक्रमाचे मुख्याध्यापिका मंगला सुंकरवार, पर्यवेक्षक सुधाकर पुराम यांनी कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!