अवैध रित्या रेतीची वाहतूक करतांना खडसंगी बफर च्या अधिकाऱ्यांनी रेती माफियांच्या मुसक्या आवरीत केला ट्रॅक्टर जप्त

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : -  दि. 19/12/2021 रोजी रात्री 2.00 वा. नियतक्षेत्र तळोधी 1 व तळोधी 2 मधील कक्ष क्र. 43 व 44 च्या नाला बाउंट्री मध्ये के. डबलु, धानकुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर) खडसंगी के. बी. गुरनुले क्षेत्र सहाय्यक तळोधी, आर. जे. गेडाम, क्षेत्र सहायक खडसंगी तसेच डी. आर. बल्की नियत वनरक्षक तळोधी-1 श्री. पी. एच. आनकाडे नियत वनरक्षक, अलिझंजा, एस. एस. टापरे, वनरक्षक, तळोधी -2, एस. एस. मेश्राम, वनरक्षक, खडसंगी 1 जी. एम. हिंगनकर, वनरक्षक खडसंगी -2 हे सामुहिक गस्त करीत असतांना अवैध्य रेती उत्खनन करणारे पॉवर ट्रॅक्टर रंग निळा Euyo 50 (नोंदणी क्रमांक नसलेले) व ट्रॉली क्र. MH 34 BF 86 55 रंग लाल आढळून आले. सदर ट्रॅक्टर चालकाचे नाव कवडु महादेव नन्नावरे रा. शेळेगाव व ट्रॅक्टर मालकाचे नाव दिनेश मनोहर डांगे रा. शेडेगाव असुन वनगुन्हा क्र. 09728/243177 दि. 19/12/2021 अन्वये वनगुन्हा नोंदवून पंचनामा तयार करुन ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असुन पुढील कार्यवाही जी. गुरुप्रसाद, उपसंचालक (बफर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, अभिजित वायकोस, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास-1) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चिमुर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!