शरद पवार व धनजंय शिंदे यांचेत मुंबई मराठी ग्रंथालय संघाचे अध्यक्ष पदासाठी लढत





मुंबई मराठी ग्रंथालय संघाचे अध्यक्ष पदासाठी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रिय अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) व आम आदमी पार्टीचे राज्याचे नेते धनजंय शिंदे (AAP Leader Dhanajay Shinde) यांचेत लढत होणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे, या ग्रंथालय संघाचे 6000 सभासद (Voter) असतांना केवळ 36 मतदारांनाच मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे. या ग्रंथालयावर शरद पवार  आपल्याच माणसांची ​उपाध्यक्ष, विश्वस्त पदावर वर्णी कशी लागेल  यासाठी घटनाबाहृय काम कसे करतात, याचे पुरावेही आपचे धनजंय शिंदे यांनी सार्वजनिक केली आहे. ( Dhananjay Shinde has also made public the evidence of how Sharad Pawar works outside the library to keep his own people, vice-presidents and trustees.) या निवडणूकीत खुद्द शिंदे यांनाही मतदानाचा हक्क नाही. निवडणूक जरी औपचारीक असली तरी, 'आम्हाला मातेसमान असलेली ही संस्था वाचविण्यांसाठी आम्ही सर्वजण शेवटपर्यंत लढणार आहोत. दहशतीत पार पाडल्या जाणार्या उद्याच्या निवडणूकीत जिंकण किंवा हरणं दुय्यम असून, सत्तेसाठी हपापलेले संस्थाचालक आपला मतदानाचा हक्क सुध्दा गमवायला तयार आहेत. असे मत श्री. शिंदे यांनी व्यक्त केले.
दरम्यान मनसेचे नेते संदिप देशपांडे (MNS Leader Sandip Deshpande) यांनी, मुंबई मराठी ग्रंथसंग्रालय निवडणूक म्हणजे, कोट्यावधी रूपयाची संपत्ती हडप करण्यासाठीचा महाविकास आघाडीचा (MVA) डाव आहे'. असे ट्विट करीत, शरद पवारांच्या 'भुखंडाचे श्रीखंड' या आरोपाला उजाळा दिला आहे.
आपचे धनंजय शिंदे आणि त्यांचे सोबत लढणार्यांनी घेतलेल्या भुमिकेचे बुध्दीवंतात स्वागत होत असून, या निमीत्ताने, 'आपण आता यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही' अशी जाहीर भुमिका घेणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उघडे पडले आहेत.

शरद पवार आणि त्यांचे पॅनल निवडूण यावे यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष सक्रिय झाले अशा आशयाचे ट्विट धनजंय शिंदे यांनी केले आहे.

मुंबई मराठी ग्रंथालय संघात 6000 चे वर सभासद मतदार असून, या सर्वाना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी महिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, (RTI Workers Anil Galgali) आपचे धनजंय शिंदे यांनी प्रयत्न केले होते. यासाठी त्यांनी धर्मदाय आयुक्त यांचेकडे तशी याचिकाही दाखल केली होती, मात्र धर्मदाय आयुक्तांनी(Charity Commissioner) या याचिकेवर कोणताही निर्णय दिला नव्हता. अखेर अनिल गलगली यांनी मुंबई मराठी ग्रंथालय संघाचे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य निवडणूकीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली होती. न्यायालयचे आदेशानंतर, निवडणूकीचे एक दिवस आधी (दिनांक 24 आॅक्टोबर) धर्मदाय आयुक्तांनी, सुनावणी घेतली. या सुनावणीत धर्मदाय आयुक्तांनी, 'अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची प्रक्रिया सदोष असली तरी, ती सुरू झाल्यामुळे, थांबवता येवू शकत नाही' असा निर्णय दिल्यांचे ट्विट या निवडणूकीतील उमेदवार धनंजय शिंदे यांनी केला आहे. यावरून, शरद पवार हे मुंबई मराठी ग्रंथालय संघाचे​ अध्यक्ष पदासाठी घटनाबाह्य पध्दतीचा वापर करीत असल्यांचे स्पष्ट झाले.
या निवडणूकीच्या निकालानंतर, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयतही दाखल करण्यांचे सुतोवाच धनंजय शिंदे यांनी केले आहे.

1 टिप्पणी:

झिंदाबाद!