महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी मंथन पुरुषोत्तम वाढई यांचा सत्कार
महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी मंथन पुरुषोत्तम वाढई यांचा सत्कार
तळोधी (बाळापुर)(यश कायरकर)
महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय तळोधी(बा),चा विद्यार्थी मंथन पुरुषोत्तम वाढई याची भारतीय सैन्यदलात निवड झाल्यामुळे महाविद्यालयात दिनांक २३ ऑक्टोबर २०२१ रोजी सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी त्याचप्रमाणे त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा व आपले व्यक्तिमत्व आणि अस्तित्व निर्माण व्हावे यासाठी एक व्यासपीठ तयार व्हावा यासाठी असे आयोजन नेहमीच महाविद्यालयाच्या वतीने होत असते.*
*सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्याण शिक्षण संस्था, नागपूर चे अध्यक्ष माननीय श्री उन्मेषजी गेडाम साहेब होते.प्रमुख उपस्थिती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री जी.जे.बुलबुले साहेब होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.मुराद पंजवानी व प्रा. सौ.बोरकर होत्या. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.*
*मंथन वाढई यांनी प्रशिक्षण काळातील अनुभव कथन केले. जिद्द चिकाटी आणि प्रयत्न माणसाला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जातो असे विचार मांडून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.*
*सदर कार्यक्रमाचे संचालन प्रा. गणेश उगेमुगे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. दैवत बोरकर आणि आभार प्रा. नितीन बोदेले यांनी केले.*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!