अवैध रेती वाहतूक करणार्‍या बैलबंडी धारकांवर कारवाई

अवैध रेती वाहतूक करणार्‍या बैलबंडी धारकांवर कारवाई

मूल (अमित राऊत )

बैल बंडीने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या पाच बंडी चालकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. ही कार्यवाही मूलचे तहसीलदार डॉक्टर रवींद्र होळी यांनी केली.
रेती घाट बंद असल्याने रेती तस्कर अवैध वाहतूक करण्याचा प्रयत्न करीत असतात.
अवैध वाहतूक करीत असणाऱ्यांवर महसूल विभाग नजर ठेऊन असताना काल पहाटेला काही बंडीचालक अवैध उत्खनन आणि रेती वाहतूक करीत होते. यावेळी तहसील कार्यालयातील नियंत्रक पथक रेती घाटावर रेट मारली असताना ही कार्यवाही करण्यात आली. रेती तस्करी करीत असल्याचे निदर्शनात आल्यास गय केल्या जाणार नाही. रेती तस्करीवर नियंत्रण ठेवण्यात आला आहे.सध्याच्या परिस्थिती मध्ये किरकोळ बंदी वगळता अवैध रेती तस्करी नियंत्रणात असल्याचे तहसीलदार होळी यानी आमचे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

1 टिप्पणी:

झिंदाबाद!