चोरीच्या आरोपात दोघांना अटक, उमा नदीवरील घटना
चोरीच्या आरोपात दोघांना अटक
मूल (अमित राऊत )
मूल येथे मोबाईल चोरीच्या घटनेत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. संजूसिंग पटवा, अनिकेत गेडाम असे चोरी करणाऱ्या आरोपीची नावे आहे. ही घटना 24 तारखेच्या रात्री एक वाजताच्या सुमारास घडली.
मूल येथील उमा नदीवर पुलाचे व रस्त्याचे काम सुरू आहे. कामावर उत्तर प्रदेश येथील बरेली जिल्ह्यातील फरदापुर तालुक्यातील रहिवासी असलेले अजय खालीराम कश्यप ड्युटी करीत असताना मूल शहरातील आरोपी संजूसिंग पटवा आणि अनिकेत गेडाम हे त्या ठिकाणी जाऊन फिर्यादीला तु क्या कर रहा है, तेरे पास क्या चीज है असे बोलत दोन थापाडा मारून हातातील मोबाईल हिसकावून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना फिर्यादीने आरोपीचा हात पकडून ओरडल्याने त्याचे सहकारी तिथे आले. रात्रौ पोलिसांची गाडी पेट्रोलियमवर असताना पकडून ठेवलेल्या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी दोन आरोपीपैकी घटनास्थळाहून पळून गेलेल्या अनिकेत गेडाम आरोपींला घरून ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल क्रमांक एम एच 34 बी टी 6266 जप्त करण्यात आली आहे.
दोन्ही आरोपीना न्यायालयात हजर करण्यात आल्या नंतर न्यायालयाने आरोपीची चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, पोलीस निरीक्षक सतीशसिह राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!