अन्यायग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीला जितेंद्र आव्हाड युवा मंच!
अन्यायग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीला जितेंद्र आव्हाड युवा मंच!
मूल तालुक्यातील फुलझरी गावातील शेतकरी रघुनाथ ढेकलू मोहूर्ले रा. फुलझरी हे धान पिकावर आलेल्या खोड किडयावर औषध चिरोली येथील कृषी केंद्रातून घेऊन फवारणी केली असता संबंधित शेतकऱ्यांचे पूर्ण धान पीक जळाले, त्यामुळे ही व्यथा सामाजिक कार्यकर्ते धनराज राकटेके यांचे माध्यमातून जितेंद्र आव्हाड युवा मंच चे जिल्हाध्यक्ष मंगेश पोटवार यांच्या कानांवर टाकताच तात्काळ तालुका कृषी अधिकारी गायकवाड साहेब याच्या कार्यालयात जाऊन अन्यायग्रस्त शेतकऱ्याला न्याय देण्याची मागणी केली*. *यावेळी तालुका कृषी अधिकारी गायकवाड साहेब कार्यालयीन कामानिमित्त बाहेर असल्यामुळे त्यांच्याशी भ्रमणध्वनी संपर्क साधून त्यांना माहिती दिली .त्यांच्या अनुपस्थित कृषी पर्यवेक्षक श्री कारंडे साहेब यांचेकडे सदर निवेदन देण्यात आले.साहेबांनी उपस्थित शिष्टमंडळाला उद्याच पंचनामा करून पुढील कार्यवाही तात्काळ करू अशी ग्वाही दिली.
यावेळी शिष्टमंडळासोबत सामाजिक कार्यकर्ते धनराज रामटेके, माजी शिवेसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष गौरव शामकुळे ,दशरथ मडावी याची उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!