तळोधी (बा) येथे कोहळी समाज स्नेहमीलन सोहळा संपन्न

तळोधी (बा) येथे कोहळी समाज स्नेहमीलन सोहळा संपन्न

तळोधी (बा.) 

कोहळी समाज संघटना तालुका नागभीड च्या वतीने 24 ऑक्टोबर 2021 रोजी तळोधी बा. येथील साई मंदिर मध्ये गुणवंत विद्यार्थी, यशवंत व्यक्ती, व कोहळी समाज स्नेहमिलन सोहळा पार पडला.
  या कार्यक्रमाला अध्यक्ष व मार्गदर्शक म्हणून मा. जयंत रामराव बोरकर, भारतीय शिक्षण संस्था अध्यक्ष नवरगाव तर विशेष अतिथी म्हणून मा. दिवाकर निकुरे जय श्री साई बिल्डर्स ब्रम्हपुरी, श्रीमती माया सहारे शिक्षिका नागभीड,श्री रमेश बोरकर कन्हाळगाव, पुनाराम निकुरे, हेमंत लांजेवार, तसेच तालुक्यातील कोहळी बांधव व मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
     यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कोहळी समाजाबद्दल माहिती सांगितली तसेच कोहळी समाजातील मुलांनी शिक्षण क्षेत्रात ठसा उमटवून स्पर्धात्मक परिक्षेकडे जास्त वळावे, संघटना मजबूत करण्यासाठी काय केले पाहिजे, त्यासाठी प्रयत्नशील असावे असे मान्यवरांनी सांगितले. तसेच दिवाकर निकुरे यांनी नागभीड तालुक्यातील कोहळी समाजाचा भवन असावा म्हणून त्यांनी समाजभवणासाठी तळोधी बाळापूर येथे जागा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.
या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, यशवंत व्यक्तींचा सत्कार, करण्यात आला.
 
     प्रास्ताविक श्री रमेश बोरकर यांनी, सूत्रसंचालन घृष्णेश्वर बोरकर यांनी तर आभार श्री सुखदेव भाकरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते करिता प्रभू मस्के सर तळोधी, भुपेश भाकरे तळोधी, सुभाष बोरकर कन्हाळगाव, दैवत बोरकर वाढोणा, प्रमोद गायकवाड, महेशजी काशिवार तसेच इतर कोहळी बांधवांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!